शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नियमित वेतनासाठी विमाशिचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST

राज्यातील आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे नियमित वेतन ...

राज्यातील आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे नियमित वेतन तीन ते चार महिने उशिरा होत असल्यामुळे शिक्षकांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय वेतन उशिरा होत असल्यामुळे बँकांचे कर्जाचे हप्ते अनियमित झाले असून, मुद्दल रकमेपेक्षा व्याजाची रक्कम वाढली आहे. तसेच सध्या कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे अनेक शिक्षक कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावत असून, अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशावेळी शिक्षकांना तीन ते चार महिने पगार मिळत नसल्याने आदिवासी क्षेत्रातील शिक्षकांचे कुटुंबीय हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे एक तारखेचे नियमित वेतन तसेच

इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण विदर्भात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शुक्रवारी आपल्याच घरी कुटुंबासह एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्याचे आव्हान केले होते. त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील सर्व आदिवासी क्षेत्रातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.

जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांच्यामार्फत वेतनाची समस्या मार्गी लावण्याकरिता शासनाला निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, चंद्रशेखर रहांगडाले, टेकचंद मारबाते, धीरज बांते, मनोज अंबादे, जागेश्वर मेश्राम, भाऊराव वंजारी, शालिकराम खोब्रागडे आदी उपस्थित होते.