Vehicle queues will no longer appear on the toll nose | आता टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा दिसणार नाही
आता टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा दिसणार नाही

ठळक मुद्देकॅशलेस प्रणाली लागू होणार : ऑटोमॅटिक पद्धतीने टोल प्लॉझा उघडणार

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : महामार्गावरुन प्रवास करताना तासनतास टोलनाक्यावर ताटकळत थांबावे लागत होते. परंतु आता टोल टॅक्स जमा करण्याकरिता रांगेत लागण्याची व तासनतास वाट पाहण्याची गरज लागणार नाही. भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधीकरण अंतर्गत येणाऱ्या सर्व वाहनाना डिसेंबर २०१९ पासून कॅशलेस करण्याची तयारी सुरू प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
सध्या प्रात्यक्षिक स्वरूपात याची चाचपणी विविध टोल नाक्यांवर घेण्यात येत आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. याकरिता वाहन चालकांना चीप खरेदी करून आपल्या वाहनांवर लावण्याची सक्ती करण्यात येणार आहे.
चीपकार्ड लावलेल्या वाहनांना टोल प्लॉझावर पोहचताच तेथे असणाऱ्या स्कॅनर चीपला स्कॅन होवून आॅटोमॅटिक पद्धतीने टोल प्लॉझाचा गेट उघडला जाणार असल्याने यामुळे वाहनधारकांची त्रासातून सुटका होणार आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे वाहन मालकांच्या बँक खात्यातून रक्कम कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना कॅश देण्याची गरज पडणार नाही. अनेक ठिकाणी टोल प्लॉझावर टॅक्स जमा करावा लागतो. मात्र तासनतास वाहनांच्या रांगा व सुट्या पैशाच्या कारणांवरुन एनएचएआयने निर्णय घेतला आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त नवीन तयार केलेल्या मार्गांवर ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. टोल नाल्यावर चार चाकी वाहन व जड वाहनांना वाहनकोंडीमुळे तेथून निघणे त्रासदायक होत होते. वाहनधारकांची होणारी समस्या लक्षात घेत केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठकीमध्येया संदर्भात अंमलबजावणीसाठी माहिती दिली आहे. त्यामुळे आता अनेक मार्गावरील टोल प्लॉझावर लागणाºया लांबच लांब रांगेपासून वाहनधारकांची सुटका होणार आहे. चिल्लर पैशामुळे होणारे वादविवाद आता कमी होण्यास मदत मिळणार आहे. सहापदरी व चारपदरी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना रस्त्याच्या बांधकामाच्या खर्चानुसार विविध रस्त्यांवर वेगवेगळ्या रक्कमेच्या स्वरुपात टोलरक्कम मोजावी लागणार आहे.


जनतेच्या तसेच वाहन चालकांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने टोलसंदर्भात नवीन व्यवस्था लागू केली आहे. ज्याची सध्या चाचपणी सुरु आहे. त्याकरिता वाहनांमध्ये फॉस्टटॅग चीप लावण्यात येणार असून याकरिता विविध कंपन्यांचे एजेंट टोलनाक्यावर उपस्थित राहून वाहन चालकांना त्याच्यासाठी लागणारा खर्च घेवून फॉस्टटॅग चीप लावून देतील.
-धीरज दीक्षित, टोल व्यवस्थापक, साकोली.

Web Title: Vehicle queues will no longer appear on the toll nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.