शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

वरठी-भंडारा महामार्ग ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

भंडारा ते वरठी या मार्गावर आयएमए हॉल, नवीन टाकळी (आयटीआय), गणेश नगरी, दाभा मोड, पाचगाव फाटा, जगनाडे चौक ते रेल्वेस्थानका पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना अडथळ्याची शर्यत पार करावा लागते. वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे . वरठी येथे जिल्ह्याचे मुख्य रेल्वे स्टेशन व सनफ्लॅग स्टील कारखाना आहे. या मार्गावर दिवसभर रहदारी असते.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता : मार्गाची दुरवस्था, रहदारीला त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : भंडारा ते वरठी व मोहाडी हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून दररोज शेकडो वाहने या रस्त्याने धावतात. दररोज विविध कामाने नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते. परंतु, या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अपघाताची शक्यता बळावली आहे. मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.भंडारा ते वरठी या मार्गावर आयएमए हॉल, नवीन टाकळी (आयटीआय), गणेश नगरी, दाभा मोड, पाचगाव फाटा, जगनाडे चौक ते रेल्वेस्थानका पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना अडथळ्याची शर्यत पार करावा लागते. वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे . वरठी येथे जिल्ह्याचे मुख्य रेल्वे स्टेशन व सनफ्लॅग स्टील कारखाना आहे. या मार्गावर दिवसभर रहदारी असते.हा राज्यमार्ग तुमसरवरून मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यांना जोडतो. त्यामुळे वाहनांचा सतत राबता असतो. भंडारा- वरठीचे अंतर ११ किलोमीटर आहे. या रस्त्याची ठिकठिकाणी चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होण्याचा प्रकार दररोज बडत आहे. या समस्येमुळे दुचाकीचालक अस्त झाले आहेत. बहुतेक ठिकाणी एका बाजूने रस्ता खराब असल्याने वाहन चालक चुकीच्या बाजूने वाहने चालवतात. त्यामुळे किरकोळ अपघातही घडले आहेत. पावसामुळे खड्ड्यांचा अंदाजही येत नाही. या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरीक करीत आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता खराब झाला असून, या मार्गावरून प्रवास करणे त्रासदायक ठरत आहे. वाहनचालक नवीन वाहन घेताना रोड टॅक्स भरतात. शासन आमच्याकडून रस्त्यासाठी पैसे वसूल करते, मग खड्डे का बुजवत नाही. खराब रस्त्यांमुळे दररोज या परीसरात मोठे अपघात होत आहेत. अपघातास कारणीभूत ठरणाºया, दुरुस्तीकडे निष्काळजीपणा दाखविणान्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.- धनपाल सार्वे, वरठी

टॅग्स :highwayमहामार्ग