शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील धानासह रबी पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानक आकाश ढगांनी भरून आले. वाराही वेगाने वाहू लागला. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. साधारणत: १५ मिनिटे झालेल्या या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले. आंब्याचा मोहोर गळून पडला. गहू, हरभरा, उडीद, मूग, लाखोरी आदी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देवातावरणात गारवा : नुकसानीची पाहणी करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा जिल्ह्याला फटका बसला असून आधारभूत खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानासह रब्बी पिकांचे यामुळे नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी जिल्ह्याच्या सर्व भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून, यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानक आकाश ढगांनी भरून आले. वाराही वेगाने वाहू लागला. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. साधारणत: १५ मिनिटे झालेल्या या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले. आंब्याचा मोहोर गळून पडला. गहू, हरभरा, उडीद, मूग, लाखोरी आदी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास भंडारा शहरात अर्धा तास चांगलाच पाऊस बरसला. भंडारा शहरालगत असलेल्या कारधा येथील हवामान विभागाच्या माहितीनुसार, शहरात सकाळी तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मंगळवारच्या तुलनेत दोन अंश घट नोंदविण्यात आली. जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला असून या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख अभिषेक नामदास यांनी दिली. 

तुमसर-मोहाडी तालुक्यात नुकसानतुमसर तालुक्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी अवकाळी पाऊस झाला. यामुळे जनजीवन प्रभावित झाले. तालुक्यातील ग्रामीण भागात या पावसाचा मोठा फटका सहन करावा लागला. पवनारा येथे गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. दिवसभर वातावरणात गारवा होता. मोहाडी तालुक्यातील लोहारा, जांब, कांद्री परिसरासह इतर भागात पाऊस झाला.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती