शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीवर होणार दोन नवीन पुलांचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

भंडारा हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (जुना क्रमांक - ६) वर वसले असून, दहा वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणात मुजबी ते शिंगोरीपर्यंतच्या रस्त्याचे मार्ग तसाच होता. शहरातून गेलेल्या महामार्गाने अनेकदा अनेक अपघात घडले. अनेकांचा जीवही गेला. मात्र, बायपास किंवा शहरातून महामार्गाचे विस्तारीकरण होण्याबाबतचा तिढा कायम होता.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी निघणार आहे. शहराबाहेरून बायपास महामार्गाचा प्रश्न मार्गी लागला असून, वैनंगा नदीवर दोन नवीन सहा पदरी पुलांचे बांधकाम केले जाणार आहे. ४२१ कोटी रुपयांचे खर्च यासाठी अपेक्षित असून, मुजबी ते शिंगोरीपर्यंतचा हा रस्ता सहा पदरी राहणार आहे. भंडारा हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (जुना क्रमांक - ६) वर वसले असून, दहा वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणात मुजबी ते शिंगोरीपर्यंतच्या रस्त्याचे मार्ग तसाच होता. शहरातून गेलेल्या महामार्गाने अनेकदा अनेक अपघात घडले. अनेकांचा जीवही गेला. मात्र, बायपास किंवा शहरातून महामार्गाचे विस्तारीकरण होण्याबाबतचा तिढा कायम होता.  गत दोन वर्षांपासून या कामाकडे सर्वांचेच लक्ष होते. अंतरिम डीपीआर सादर केल्यानंतर याबाबतचे काम पुणे येथील स्वामी समर्थ नामक एका कंपनीला देण्यात आले आहे. सहा पदरी असलेला हा महामार्ग भंडारा बाहेरून जाणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ४२१ कोटी ४० लक्ष रुपये इतकी आहे. भंडारा बायपास या रस्त्याचे बांधकाम अंदाजे १४.८० किलोमीटर असून, ते  २१ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मुख्य रस्त्याची रुंदी ३२ मीटर राहणार असून, सर्व्हिस रोडची रुंदी सात मीटर व लांबी १७.४६ किमी आहे. महामार्गाच्या कडेला दोन मीटर फूटपाथसह राहणार आहे. या महामार्गावर १७ ठिकाणी अंडरपास राहणार आहे. ६० हेक्टर जमिन संपादनाची प्रक्रियाही पूर्ण झाली असून, यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. आधुनिक पद्धतीने वैनगंगा नदीवर दोन विशालकाय पुलांची निर्मिती हेच आवाहनात्मक काम ठरणार आहे. 

आज होणार भूमिपूजन- बहुप्रतिक्षित असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भंडारा बायपासचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्या, गुरुवारी (दि. ३)  दुपारी ४ वाजता केले जाणार आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर ना. गडकरी यांच्याहस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचेही उद्घाटन होणार आहे.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीriverनदी