बारव्हा, चिचाळ परिसराला वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:01:03+5:30

लाखांदूर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला होता. या वादळी पावसाच्या तडाख्यात तालुक्यातील किन्ही/ गुंजेपार येथील शेत शिवारात वीज पडून तब्बल १५ शेळ्याही मृत्युमुखी पडल्या होत्या. त्याच दिवशी बारव्हा-चिचाळ परिसरात वादळाच्या तडाख्याने व पावसाने जवळपास चार ते पाच घरावरील कौलारू व टीन पत्र्यांची छते पूर्णत: उडून गेली.

Twelve, torrential rains hit the Chichal area | बारव्हा, चिचाळ परिसराला वादळी पावसाचा तडाखा

बारव्हा, चिचाळ परिसराला वादळी पावसाचा तडाखा

Next
ठळक मुद्देघरांचे नुकसान : धानालाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : दोन दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे बारव्हा-चिचाळ परिसरातील घरांचेछत उडाले. उन्हाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आपदग्रस्तांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
लाखांदूर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला होता. या वादळी पावसाच्या तडाख्यात तालुक्यातील किन्ही/ गुंजेपार येथील शेत शिवारात वीज पडून तब्बल १५ शेळ्याही मृत्युमुखी पडल्या होत्या. त्याच दिवशी बारव्हा-चिचाळ परिसरात वादळाच्या तडाख्याने व पावसाने जवळपास चार ते पाच घरावरील कौलारू व टीन पत्र्यांची छते पूर्णत: उडून गेली. अनेक कुटुंब उघड्यावर आल्याचे दिसून आले. काही शेतकऱ्यांच्या शेतात लागवडीखालील कापणी योग्य उन्हाळी धान पावसाने साचलेल्या शेतात पडल्याने धानाची लोंबी नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
लाकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने कुटुंब पोषणाचा मोठा पेच उभा ठाकला असताना अचानक झालेल्या वादळी पावसामुळे घरांचे व शेतीचे झालेल्या हानीमुळे येथील नागरिक अधिकच संकटात सापडले आहेत.
दरम्यान, वादळी पावसाच्या तडाख्यात घराचे नुकसान झालेल्या आपदग्रस्तांना मध्ये संजय रंगारी चिचाळ, वसंता झोडे बारव्हा व अन्य काही जणांचा समावेश आहे तर उन्हाळी धान पिकाचे नुकसान झालेल्या शेतकºयांमध्ये पुष्पा नीलकंठ लोंढे, धनराज रुईकर, रामचंद्र तरवरे, धनंजय लोंढे यासह परिसरातील बहुसंख्य शेतकºयांच्या शेतातील उन्हाळी धान पिकाची हानी झाली आहे.
याप्रकरणी शासन प्रशासनाने आपदग्रस्त भागाची पाहणी व चौकशी करून पीडितांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी बालू चुन्ने सह आपदग्रस्तांनी केली आहे.

Web Title: Twelve, torrential rains hit the Chichal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस