कृष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोधमोहिम अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:49+5:30

अभियाना दरम्यान तालुक्यातील ग्रामीण शहरी व निवडक कॉपेरिशन क्षेत्रातील घरांना आरोग्य कर्मचारी घरोघरी भेटी देवून कृष्ठरोग निर्मूलनाकरिता सर्वेक्षण करणार आहेत. तर कृष्ठरोग उपचारावरील ५६ क्षयरोग ९१, एमडीआर ५ रुग्ण व समाजातील निदान न झालेले कृष्ठरोग लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणण्यात येणार आहे.

Tuberculosis, Tuberculosis Research Campaign | कृष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोधमोहिम अभियान

कृष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोधमोहिम अभियान

ठळक मुद्देएम.ए. मेश्राम : लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात शोध अभियान सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये संयुक्त कृष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व असंसर्गजन्य प्रतिबंध जागरूकता अभियान १३ ते २८ सप्टेंबर या कालावधित जिल्ह्यातील सर्व ग्रामीण, शहरी व निवडक कॉपेरिशन क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. याकरिता लाखांदूर तालुका समन्वय समिती सभा ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम.ए. मेश्राम यांचे विशेष मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. डब्ल्यु. बन्सोड यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी डॉ. जी.एस. कापगते, डॉ. एम.के. चौधरी, डॉ. सी.झेड. नखाते, आर.ई. नखाते, ए.जी. भुसारी, एन.एस. शहारे, आरोग्य सहायक मांढरे, मेंढरे, अश्विनी आत्राम, गणेश आंबिलढुके, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक अनुप हातेल, भारत गणवीर, रवि झोडे, प्रशांत बोरीकर आदी सामाजिक संस्थाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अभियाना दरम्यान तालुक्यातील ग्रामीण शहरी व निवडक कॉपेरिशन क्षेत्रातील घरांना आरोग्य कर्मचारी घरोघरी भेटी देवून कृष्ठरोग निर्मूलनाकरिता सर्वेक्षण करणार आहेत. तर कृष्ठरोग उपचारावरील ५६ क्षयरोग ९१, एमडीआर ५ रुग्ण व समाजातील निदान न झालेले कृष्ठरोग लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणण्यात येणार आहे. तसेच क्षयरोगाचे निदानाकरिता क्षयरोगाचे निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा शोध घेवून त्यांना औषधोपचार देण्यात येणार आहे. असंसर्गजन्य रोगाबद्दल समाजातील ३० व अधिक वयोगटातील लोकांची तपासणी करून उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोग, मुख गर्भाशय व स्तन या रोगाबाबत सनियंत्रणाकरिता सर्वेक्षण करण्यता येणार आहे. १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत घरोघरी करण्यात येणाºया सर्वेक्षणाकरिता सर्व जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन प्रशानाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनतेला केले आहे.

Web Title: Tuberculosis, Tuberculosis Research Campaign

टॅग्स :Healthआरोग्य