शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता सरकारी कार्यालयातून तंबाखू होणार हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ च्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांच्या अध्यक्षतेत जिल्हा सनियंत्रण व समन्वय समितीची सभा घेण्यात आली होती. या सभेत शाळेतील आयईसी, जनजागृती व तक्रार, तंबाखूमुक्त शाळा, मौखीक तपासणी, तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखूमुक्त कार्यालय आणि कारवाई या विषयावर चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देदंडासह गुन्हाही होणार दाखल : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत केली जाणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासकीय कार्यालयाच्या भिंती आणि कोपरे पान आणि खºर्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले दिसतात. येथे थुंकू नये असे फलक असलेल्या ठिकाणीच थुंकणारे महाभागही कमी नाही. शासकीय कार्यालयांची ही अवस्था तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच आता प्रत्येक शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एवढेच नाही तर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई आणि गुन्हा नोंदविण्याचा निर्णयही भंडारा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ च्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांच्या अध्यक्षतेत जिल्हा सनियंत्रण व समन्वय समितीची सभा घेण्यात आली होती. या सभेत शाळेतील आयईसी, जनजागृती व तक्रार, तंबाखूमुक्त शाळा, मौखीक तपासणी, तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखूमुक्त कार्यालय आणि कारवाई या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. मनिष बत्रा यांनी सखोल मार्गदर्शन केले. या सभेत प्रामुख्याने तंबाखूमुक्त कार्यालयावर विशेष भर देण्यात आला. शहरातील शाळा, महाविद्यालयासह सर्व सरकारी कार्यालयाच्या १०० यार्ड आत तंबाखूजन्य पदार्थ विक्रीबंदी करुन कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त करण्यासाठी कार्यालयाबाहेर तंबाखू निषेध फलक ठरविण्यात आले. कोणताही कर्मचारी तंबाखू किंवा खर्रा खाताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी. दंड न दिल्यास थेट पोलिसात तक्रार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.तंबाखूमुक्त शाळा अभियान भंडारा जिल्ह्यात जोर धरत आहे. अनेक शाळा तंबाखूमुक्त होत आहे. त्यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशनचे किशोर ठवकर प्रयत्न करीत आहेत. परंतु या बैठकीत त्यांनी पवनी व लाखांदूर तालुक्यातील शाळा तंबाखूमुक्त अभियान राबविण्यात उदासिन असल्याची खंत व्यक्त केली.या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, प्रभारी पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण गाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, तुरुंग अधिकारी क्षीरसागर उपस्थित होते.‘कोटपा’अंतर्गत ३१ हजारांचा दंड वसूलजिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात ‘कोटपा’ कायद्यांतर्गत तंबाखुजन्य पदार्थांचा वापर करणाऱ्यांकडून यावर्षात ३१ हजार ८३७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती डॉ. मनिष बत्रा यांनी यावेळी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक येतात. त्यांनी तंबाखू पासून दुर राहावे यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. त्याला बऱ्यापैकी यश येत आहे. मात्र शासकीय कार्यालयात आजही मोठ्या प्रमाणात तंबाखूचे सेवन होत आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी