शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरच्या डॉक्टरांनी केली अन्न नलिकेची शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:31 IST

अन्ननलिकेचा दुर्धर आजार जडलेल्या महिलेने महानगरासह विविध ठिकाणी उपचार घेतले. नामवंत डॉक्टरांनी हात वर केल्यावर जगण्याची कोणतीच आशा नव्हती. अशा परिस्थितीत तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत एका डॉक्टरने एन्डोस्कोपीद्वारे जटील शस्त्रक्रिया केली.

ठळक मुद्देमहिलेला जीवदान : शासकीय रुग्णालयातील डॉक्टर ठरले देवदूत

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : अन्ननलिकेचा दुर्धर आजार जडलेल्या महिलेने महानगरासह विविध ठिकाणी उपचार घेतले. नामवंत डॉक्टरांनी हात वर केल्यावर जगण्याची कोणतीच आशा नव्हती. अशा परिस्थितीत तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत एका डॉक्टरने एन्डोस्कोपीद्वारे जटील शस्त्रक्रिया केली. आता त्या महिलेच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. उपजिल्हा रुग्णालयात नव्याने रुजू झालेले डॉक्टर सौरभ कुंभारे या महिलेसाठी देवदूत ठरले.सुनिता पटले (३०) रा.मांगली ता.तुमसर असे अन्न नलिकेचा आजार जडलेल्या महिलेचे नाव आहे. दोन वर्षापूर्वी तिचा विवाह तिरोडा तालुक्यातील एका सैन्यदलातील जवानासोबत झाला होता. तो देशसेवेसाठी कार्यरत होता. इकडे गावी पत्नी परिवारासोबत राहत होती. अशातच तिला भोजन करताना त्रास जाणवू लागला. अन्न पोटात जाताच तिला खूप वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तिचे खाणे बंद झाले.केवळ दूध आणि पाण्यावर ती दिवस काढू लागली. ४० किलो वजनाची सुनिता अवघ्या काही दिवसात २४ किलोची झाली. खाटेवर मरणासन्न अवस्थेत पडून राहायची. हा प्रकार तिच्या वडीलांना पाहावला नाही. त्यांनी तिला तुमसर येथे उपचारार्थ आणले. भंडारा, नागपूर व मोठ्या शहरातील नामवंत डॉक्टरांना दाखविले. सुरुवातीला डॉक्टरांनी कॅन्सरचे निदान केले. नंतर अन्न नलिका चोक झाल्याचे समोर आले. मात्र उपचार करण्यासाठी सर्वांनीच हात वर केले. आता तिला आपले मरण डोळ्यापुढे दिसू लागले. अशातच तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर सौरभ रमेश कुंभारे रूजू झाल्याची माहिती मिळाली. वडीलांनी मोठ्या आशेने त्यांच्याकडे आणले. त्यांनी सुनिताच्या अन्ननलिकेच्या तुकड्याची तपासणी केली. आजाराचे निदान लागले. त्यानंतर एन्डोस्कोपीद्वारे कुठलीही इजा न पोहचविता सुनितावर शस्त्रक्रिया केली. उपजिल्हा रुग्णालयात एन्डोस्कोपीची सुविधा नसल्याने शहरातीलच एका खासगी रुग्णालयाची मदत घेण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर सुनिताच्या प्रकृतीत फरक जाणवू लागला. वजनातही वाढ होऊ लागली. आता पातळ अन्न, फळे ती ग्रहण करते. तिचे चालणे, फिरणे सुरु झाले असून जणू सुनिताला पुनर्जन्मच मिळाला.सीआयई बलून शस्त्रक्रिया आतापर्यंत नागपूर सारख्या शहरात होत होती. ती सर्वसामान्यांना परवडणारी नव्हती. मी तुमसरच्या मातीत जन्माला आल्याने शहरवासीयांसाठी काही करता येईल या उद्देशाने सुनितावर शस्त्रक्रिया केली. यात तिची प्रकृती ठणठणीत झाली. याचा मला आनंद आहे.-डॉ.सौरभ कुंभारे, तुमसर.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल