शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मूत्राशयातील कर्करोगाच्या गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST

येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणारे डॉ. सौरभ कुंभारे हे रुग्णालयातील ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी करत असताना मध्य प्रदेशातून ...

येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणारे डॉ. सौरभ कुंभारे हे रुग्णालयातील ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी करत असताना मध्य प्रदेशातून विजय दरेकर (१८) रा. बोनकट्टा ता. कटंगी, जि. बालाघाट येथील रुग्ण हा तपासणीसाठी आला असता त्याच्या मूत्राशयाच्या पिशवीत गाठ असल्याचे निदर्शनास आले. त्याला विविध चाचण्या करण्यास सांगितले. चाचणीअंती त्या युवकाच्या मूत्राशयाच्या पिशवीत गाठ असल्याचे निष्पन्न झाले. मात्र उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साधनसामग्री नसल्याने डॉ. कुंभारे यांनी त्यांच्या खासगी रुग्णालयात अतिशय कमी खर्चात त्या युवकावर दुर्बिणद्वारे जटिल व यशस्वी शस्त्रक्रिया करून कर्करोगापासून रोगमुक्त करून त्या युवकाला नवसंजीवन मिळवून दिले. तुमसरसारख्या छोट्या शहरात आता एवढ्या जटिल व कॅन्सरसारख्या गाठीच्या शस्त्रक्रिया करून तुमसरचे नाव डॉ. कुंभारे यांनी चमकवले आहे.

कोट

सदर आजार साधारणपणे ४० वर्षावरील इसमांना होतो. क्वचितच किशोरवयीन मुलांना हा आजार जडतो. यामध्ये वारंवार लघवी होणे, लघवीतून रक्त जाणे, कोथा दुखणे अशी लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घेतल्यास रुग्णाचे प्राण वाचवता येऊ शकतात.

डॉ. सौरभ कुंभारे, तुमसर

---------------------------

(ही बातमी डबल कॉपी पेस्ट झालेली होती.)