शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कान्होबाच्या निमित्ताने कुंभार गल्लीत भक्तांची पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 5:00 AM

यंदा कोरोनाच्या सावटात अत्यंत साधेपणात गोकूळाष्टमी साजरी होत असून कान्होबाला घरी नेण्यासाठी पालांदूरच्या कुंभार गल्लीत भक्तांची पाऊले वळली आहे. लॉकडाऊनच्या काळात कुंभार बांधवांना हक्काचा रोजगारही मिळाला आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे हाल सुरू आहे. मात्र मूर्तीकारांना सध्या बरे दिवस आले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये हक्काचा रोजगार : कोरोनामुळेसाधेपणात उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : श्रावणमास म्हटला की आनंदाला उधाण. याच महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा अर्थात कानोबाचा सोहळा गावोगावी आणि घरोघरी साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या सावटात अत्यंत साधेपणात गोकूळाष्टमी साजरी होत असून कान्होबाला घरी नेण्यासाठी पालांदूरच्या कुंभार गल्लीत भक्तांची पाऊले वळली आहे. लॉकडाऊनच्या काळात कुंभार बांधवांना हक्काचा रोजगारही मिळाला आहे.यावर्षी कोरोना संकटामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे हाल सुरू आहे. मात्र मूर्तीकारांना सध्या बरे दिवस आले आहे. गोकुलाष्टमी, गणेशचतुर्थी यामुळे कुंभार गल्लीत चहल पहल वाढली आहे. मंगळवारी साजरा होणाºया कान्होबा सोहळ्यासाठी भक्त आतूर झाले आहेत. पालांदूरच्या कुंभार गल्लीत ओळीने श्रीकृष्णाच्या मूर्ती मांडून ठेवल्या आहेत. या गल्लीत २५ ते ३० कुंभारांची घरे असून ही सर्व मंडळी भक्तांची वाट पाहत आहे. अगदी साधेपणाने आणि घरगुती उत्सव असल्याने अनेक जण लहान मूर्ती खरेदीकडे कल दिसत आहे. महिला मूर्तीकार वनिता पातरे म्हणाले, गत आठ दिवसापासून कान्होबा घडविण्याचे काम सुरू आहे. घरातील सर्व सदस्य या कामात व्यस्त आहेत. यावर्षी आम्ही ५० मूर्त्या घडविल्या असून भक्त जो दाम देईल, तो आम्ही स्विकारून असे त्यांनी सांगितले.आज श्रीकृष्णाची घराघरात होणार प्राणप्रतिष्ठाकरडी (पालोरा) : श्रावण मासात येणारा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी, करडी परिसरात हा सण मोठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरा केला जातो. हिंदू धर्मियांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचे सणाचे विशेष महत्व आहे. भाविक मोठ्या उत्साहात, भक्तीभावात भगवान कृृष्णाची प्राणप्रतिष्ठा घराघरात करतात. करडी परिसरात या उत्सवाला उधाण असते. मनोभावे पूजन व विविध कार्यक्रमांचे रात्री आयोजन पार पडतात. भगवान कृष्णाला पंचपक्कावानांचा भोग लावला जातो. भाविक भक्तांना सुद्धा पक्कवानांचा, फराळांचा आस्वाद मिळतो. कार्यक्रमात तरूणांचा जोश पाहण्यासारखा असतो. रात्री भजन, किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन होतात. रात्री १२ कृष्ण जन्माचे वेळी पूजापाठ करून, नारळ फोडून प्रसादाचे वितरण केले जाते. परंतू सध्या कोरोना संकट असल्याने अशा सार्वजनिक कार्यक्रमांवर विरजन पडले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक