शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. ४.३६ कोटी रूपयांनी तोट्यात

By admin | Updated: May 1, 2017 00:21 IST

भंडारा विभागात येणाऱ्या सहा आगारातून १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या वर्षात ११३ कोटी ३८ लाख ४८ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले.

भंडारा रापमं विभाग : टोलनाक्यावर ३.६७ कोटींचा खर्च, वार्षिक सवलत कॉर्डला ‘बाय-बाय’देवानंद नंदेश्वर : भंडारा भंडारा विभागात येणाऱ्या सहा आगारातून १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या वर्षात ११३ कोटी ३८ लाख ४८ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. यात कर्मचाऱ्यांचे वेतन, बसेसची देखभाल, अवैध वाहतूक, डिझेल, टोलटॅक्स आदीवरील खर्च वगळता विभागाला ४ कोटी ३६ लाख ६२ हजार रूपयांचा तोटा झाला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत उत्पन्नामध्ये १ कोटी ९ लाख ९१ हजार रूपयांमध्ये घट झाली आहे. राज्यातील प्रवाशांचा भार वाहणाऱ्या एसटीची संपूर्ण राज्यात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यापासून भंडारा विभागदेखील सुटले नाही. भंडारा विभागात भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्याचा समावेश आहे. यात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, पवनी, तिरोडा असे मिळून भंडारा विभागात एकूण सहा आगार आहेत. या आगारांअंतर्गत ९ सेमी लक्झरी, ३० मिडी असे एकूण ४३७ बसेस आहेत. भंडारा-साकोली, साकोली-लाखांदूर, साकोली-मोरगाव (अर्जूनी), तिरोडा-गोंदिया, गोंदिया-आमगाव, पवनी-लाखांदूर, भंडारा-तुमसर या मार्गावर अवैध प्रवासी वाहनामुळे महामंडाळाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. दुसरीकडे दहा टक्के वार्षिक सवलत कॉर्ड योजनेलाही रापमंने ‘ बाय-बाय’ केला आहे.भंडारा विभागाला एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ११३ कोटी ३८ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. यात भंडारा आगाराला २४ कोटी ८९ लाख, गोंदिया २४ कोटी ३९ लाख, साकोली २३ कोटी ९८ लाख, तिरोडा ११ कोटी ५२ लाख, तुमसर २० कोटी ०८ लाख, पवनी आगारात ८ कोटी ५१ लाख रूपयांचा समावेश आहे. मागीलवर्षी भंडारा विभागाला ११४ कोटी ४८ लाखांचे उत्पन्न झाले होते. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी भंडारा विभागाला १ कोटी ९ लाख ९१ हजार रुपयांचे उत्पन्न कमी मिळाले आहे. उत्पन्नात घट झाली असली तरी टोलटॅक्सवर ३ कोटी ६७ लाख, यासह डिझेल वेतन,टायर व इतर खर्च वगळता भंडारा विभागाला ४ कोटी ३६ लाखाचा फटका बसला.जिल्ह्यातील गाड्यांमध्ये ९ सेमी लक्झरी, ३० मिडी, मानवविकास मिशनच्या ९१ बसेससह ४३७ बसेसद्वारे वाहतूक नियमित सुरू आहे. भंडारा विभागाने अलिकडे लांब पल्ल्याच्या अनेक बसगाड्या सुरू केल्या आहेत. अनेक मार्गावर शटलसेवा तसेच उन्हाळ्यात प्रवाशांची वर्दळ लक्षात घेता ज्यादा बसेस सोडण्यात येत आहेत. भंडारा विभागाला अनेक वर्षापासून तोटा सहन करावा लागत आहे. एस टी नफ्यात येण्यासाठी योग्य उपाययोजनेची गरज आहे.बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात पार्किंग न करण्याचा नियम आहे. मात्र अवैध वाहतूकदार या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. पोलीस व आरटीओ विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडून प्रयत्न होत नसल्यामुळे महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे.- गजानन नागुलवार,विभागीय नियंत्रक (प्रभार) तथा यंत्र अभियंता, भंडारा