योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

By Admin | Updated: September 21, 2016 00:36 IST2016-09-21T00:36:18+5:302016-09-21T00:36:18+5:30

शासन शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात विविध योजना राबवित आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी व्यापारी वृत्ती बाळगणे गरजेचे असून ...

Spread the plan to the farmers | योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

बाळा काशीवार : शिवनीबांध येथे मत्सबीजांचे वाटप
साकोली : शासन शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात विविध योजना राबवित आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी व्यापारी वृत्ती बाळगणे गरजेचे असून या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे संबंधित विभागाची जबाबादार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळाा काशीवार यांनी केले.
शिवनीबांध मत्स्य बिज निर्मिती केंद्र येथे आत्मा मत्स्य व्यवसाय व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेततळीसाठी मत्स्यबीज वाटप प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भंडारा जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी मा. मा. चांदेवार, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग भंडारा, व्ही. के. पसारकर, आत्माच्या उपसंचालिका पी. एस. खटावकर, साकोली ता.कृ. अधिकारी जी. सी. चौधरी, लाखनी ता.कृ.अधिकारी पी. पी. गिदमारे, मंडळ कृषी अधिकारी डी. एस. गायकवाड, कृषी सहायक चंदन मेश्राम उपस्थित होते.
यावेळी आमदार काशीवार म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात आर्थिक प्रगतीसाठी शेतकऱ्यांनी शेतीसोबत पुरक व्यवसाय करणे काळाची गरज आहे. यात शेत तळ्याच्या योजनेच्या माध्यमातून मत्स्यशेती करुन शेतकऱ्यांनी आपला आर्थिक विकास करावा असे आवाहन करुन काशीवार म्हणाले की नविन पिढीला उच्च शिक्षणासोबतच व्यवसायात्मक प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे.
याप्रसंगी आमदार काशीवार यांच्या हस्ते भंडारा जिल्ह्यातील ११० लाभार्थी शेतकऱ्यांना एक लक्ष दहा हजार मत्स्यबीजाचे वाटप करण्यात आले. यावेळी खटावकर यांनी आत्मा प्रकल्पाबाबत माहिती दिली व चांदेवार व पसारकर यांनी मत्स्यशेती सबंधी प्रात्याक्षीक करुन सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. संचालन चांदेवार यांनी तर आभार प्रदर्शन शिवनीबांध केंद्राचे सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हरिशचंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकरी व मत्स्य शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Spread the plan to the farmers