चौकीसाठी पोलिसांच्या खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 05:00 AM2020-02-18T05:00:00+5:302020-02-18T05:00:46+5:30

बपेरा आंतरराज्यीय सिमेवर पोलीस चौकी मंजुरीची ओरड जुनी असल्याने तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहु यांनी पोलीस चौकीला मंजुरी दिली आहे. त्यांचे हस्ते खाजगी घरात पोलीस चौकीचे उद्घाटन झाले आहे. ही चौकी आजतागायत भाडे तत्वावर सुरु आहे. चौकीचे भाड्याची रक्कम जिल्हा पोलीस कार्यालयाकडून प्राप्त होत नाही.

Scissors pocket for police station | चौकीसाठी पोलिसांच्या खिशाला कात्री

चौकीसाठी पोलिसांच्या खिशाला कात्री

Next
ठळक मुद्देपोलीस चौकी शोभेची वास्तू : समस्यांच्या विळख्यातून मुक्तता केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : बपेरा आंतरराज्यीय सीमेवरील पोलीस चौकीच्या भाड्यापोटी पोलिसांच्या खिशाला कात्री लावण्यात येत आहे. या चौकीचे भाडे जिल्हा पोलीस कार्यालयाकडून प्राप्त होत नाही. यामुळे ही चौकीची फक्त औपचारीकता म्हणून राहिली आहे.
बपेरा आंतरराज्यीय सिमेवर पोलीस चौकी मंजुरीची ओरड जुनी असल्याने तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहु यांनी पोलीस चौकीला मंजुरी दिली आहे. त्यांचे हस्ते खाजगी घरात पोलीस चौकीचे उद्घाटन झाले आहे. ही चौकी आजतागायत भाडे तत्वावर सुरु आहे. चौकीचे भाड्याची रक्कम जिल्हा पोलीस कार्यालयाकडून प्राप्त होत नाही. या चौकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांना स्वत:च्या वेतनातून खाजगी घर मालकांना भाडा देण्याची वेळ आली आहे. त्यांनाच पोलीस चौकीची देखभाल आणि दुरुस्तीकरिता आर्थिक जुळवाजुळव करावी लागत आहे. यामुळे त्यांची कसरत होत आहे.
या चौकीची ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी अवस्था झाली आहे. पोलीस चौकीची नविन इमारत बांधकामकरिता जागा राखीव करण्यात आली आहे. परंतु या जागेत इमारत बांधकामाचा मुहूर्त अद्याप सापडलेला नाही. निधी आणि रिक्त पदाचा बनवा संपतासंपेना असे चित्र आहे.सिहोरा पोलीस स्टेशनचौकीमध्ये पोलिसांचे नियुक्तीकरिता रिक्त पदे भरण्यात आले नाही.पदे रिक्त असल्याने पोलीस चौकी औपचारीकता असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पोलीस प्रशासन सिहोरा परिसरात असणाºया स्टेशन व चौकीचे संदर्भात गंभीर नाही. यामुळे नागरिकांत नाराजीचा सुर आहे. पोलीस चौकीत असणारी समस्या निकाली काढण्यात येत असल्याचे नागरिकांचे सुरक्षा ऐरणीवर आली आहेत. चौकीत पोलीस राहत नसल्याने पोलीस चौकीचे औचित्यावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या चौकीला आता बंद करण्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे नागरिकांत नाराजीचा सुर आहे.

वसाहत बांधकाम नाही
सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलिसांकरिता वसाहत बांधकाम करण्यात आले नाही. यामुळे त्यांचे वास्तव्य भाड्याचे घरात आहे. मध्यंतरी वसाहत बांधकाम करीता मंजुरी मिळणार असल्याची चर्चा होती. परंतु नंतर ही चर्चा हवेत विरली आहे. पोलीस स्टेशनचे आवारात वसाहत बांधकाम करण्याची मागणी आहे.
बंदी गृहातून कामकाज
पोलीस स्टेशनमध्ये इमारतीचा अभाव आहे. परिसरात चार बिट असतांना बिट अलदाराकरिता स्वतंत्र खोलया नाहीत. यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहेत. खोल्या अभावी बंदी गृहातून पोलिसांत प्रशासकीय कामकाज करावे लागत आहे. यामुळे बैठकीची व्यवस्था नाही.
महिला प्रशासन गृहाचा अभाव
पोलीस स्टेशनमध्ये महिला प्रशासन गृहाचा अभाव आहे. यामुळे महिला प्रशान गृहाचे बांधकाम मंजूर करण्यात यावे याशिवाय स्टेशनच्या मागील बाजुला मजबुत आवार भिंत नाही. तारेचा तुटलेला कंपाऊंड आहे.

Web Title: Scissors pocket for police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस