शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

खापा चौकात पकडले रेतीचे ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्याअंतर्गत विविध ठिकाणी धाडसत्र घालण्याची मोहीम सुरु आहे. २४ सप्टेंबरला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना विना परवाना रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक आढळून आले.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : ७५ लाखांचा मुद्देमाल

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मंगळवारी तहसीलदारांनी रेती तस्करांवर कारवाई करीत पाच ट्रक जप्त केले होते. अवघ्या २६ तासाच्या आतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुमसरजवळील खापा चौकात कारवाई करून पुन्हा पाच ट्रक पकडले. या घटनेने तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरु असल्याचे समोर आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्याअंतर्गत विविध ठिकाणी धाडसत्र घालण्याची मोहीम सुरु आहे. २४ सप्टेंबरला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना विना परवाना रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक आढळून आले. तपासणीदरम्यान पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी तात्काळ पाचही ट्रकचालकांवर कारवाई केली. यात खापा चौकात पकडण्यात आलेल्या वाहनचालकांकडून रेती वाहतुकीचा परवाना आढळून आला नाही. यावेळी पोलिसांनी ट्रक क्रमांक एमएच २७ बीएक्स ४९९९, एमएच २७ डीएक्स ४१२१, एमएच ४० बीजी ९८२५, एमएच ३० बीडी २८८२ व एमएच ३० बीडी ४५१२ जप्त केले. या ट्रकमध्ये अंदाजे प्रत्येकी आठ ब्रास रेती भरल्याचे निदर्शनास आले. ट्रकची किंमत ७५ लक्ष रुपये असून पुढील कारवाई सुरु आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील उईके,पोलीस नायक प्रदीप डहारे, विजय तायडे, निरंजन कडव आदींनी केली. 

टॅग्स :sandवाळू