शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST

मोहाडी :- भंडारा जिल्हा अनलॉक प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात आल्याने दुकानांना वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची ...

मोहाडी :- भंडारा जिल्हा अनलॉक प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात आल्याने दुकानांना वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र ग्रामीण भागाकडे कोणताच अधिकारी लक्ष देत नसल्याने तेथील बाजार व दुकाने मास्क व सोशल डिस्टनसिंगचे नियम न पाळता सायंकाळपर्यंत सुरू असतात. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रूग्ण ग्रामीण भागत आढळल्यानंतरही नागरिक बेफिकिर दिसत आहेत.

कोरोनाने शहरी भागासोबतच ग्रामीण भागात सुध्दा कहर केला. अनेक लोकांचे बळी गेले. अनेक परिवाराला घरची कमावती व्यक्ती किंवा प्रियजन गमवावा लागला. हे दुःख आजही त्यांना सलत आहे. परंतु आता कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा बेफिकिर झाले आहेत. गत वर्षी सुद्धा असेच झाले व कोरोनाची महाभयंकर लाट आली. रुग्ण जास्त व बेड, ऑक्सिनज सिलिंडर कमी अशी परिस्थिती उदभवली. बेड न मिळाल्याने अनेकांनी घरीच प्राण सोडले. तर काहींनी लाखो रुपयांचा उपचार केला. जनतेच्या डोळ्यासमोर हे वास्तव असतांनाही पुन्हा आता लोक सैरभैर होत आहेत.

मास्क, सेनेटायझर, सोशल डिस्टनसिंग चा वापर करणे विसरले आहेत. शहरी भागात आठवडी बाजार बंद असला तरी ग्रामीण भागातील काही गावात आठवडी बाजाराला सुरवात झाली. तेथे गर्दी होत आहे. ग्रामीण भागातील काही मोठ्या गावातील सर्व प्रकारची दुकाने नियम धाब्यावर बसवून सायंकाळपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. कोरोनाने विस्कळीत झालेली ग्रामीण अर्थव्यवस्था आता पूर्वपदावर येत असताना जनतेची छोटीशी चूकही मोठी हाऊ शकते. शासनाने घालून दिलेले नियम जनतेने काटेकोरपणे पाळणे हाच एकमेव उपाय आहे. तालुका प्रशासनानेही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.