शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

धावपळीत ‘फाईल’ तयार

By admin | Updated: April 30, 2017 00:25 IST

अंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ११७ शिक्षकांच्या झालेल्या बदल्या रद्द केल्या आहे. यात आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी आता सावध भूमिका घेतली आहे.

प्रकरण शिक्षकांच्या बदलीचे : अनियमितता झाली नसल्याची सावरासावरप्रशांत देसाई भंडाराअंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ११७ शिक्षकांच्या झालेल्या बदल्या रद्द केल्या आहे. यात आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी आता सावध भूमिका घेतली आहे. या बदल्या नियमानुसार झाल्याचा अहवाल आयुक्ताकडे सादर करण्याच्या दृष्टीने जि. प. प्रशासनाने प्रयत्न चालविले आहे. दरम्यान या बदल्या रद्द करु नये, अशा आशयाची फाईल शनिवारी सायंकाळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविकांत देशपांडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिर यांच्याकडे सादर केल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. या अनुशंगाने चौकशी समिती नेमली होती. या समितीला बदली प्रकरणात अनियमितता झाल्याचे आढळून आले. त्यामुळे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी २१ एप्रिलला आदेश काढून ११७ शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याने बदल्या रद्द केल्याचे आदेश जिल्हा परिषद भंडाराला बजावले. आदेशानुसार जि. प. प्रशासनात खळबळ उडाली. यानंतर येथील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सदर प्रकरण अंगलट येऊ नये व रद्द झालेल्या बदल्या पूर्ववत रहाव्या यासाठी प्रशासकीय यंत्रणेवर दबाव तंत्राचा वापर सुरु आहे. दरम्यान या बदल्यामध्ये अनियमितता झाली नसून सर्व नियमानुसारच असल्याचे जि.प. प्रशासनाकडून सांगण्यासाठी सावरासावर सुरु केली आहे.आयुक्तांनी ३० एप्रिलपर्यंत जि. प. ला अहवाल मागितला आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक अधिकारी अडकण्याची शक्यता आहे. एकमेकांवर ताशेरे ओढणारे अधिकारी व पदाधिकारी यांनी एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न सुरु केले आहे. शनिवारी दिवसभर शिक्षण विभागात शिक्षकांच्या बदली प्रकरणातील फाईल्स या टेबलवरुन त्या टेबलवर तेथून शिक्षणाधिकारी देशपांडे यांच्या टेबलवर असा दिवसभर धावपळीचा प्रवास सुरु होता. शिक्षणाधिकारी नॉट रिचेबलसायंकाळच्या सुमारास शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी बदली प्रकरण नियमानुसार झाली असून ती प्रक्रिया थांबवावी असा अहवाल तयार करुन मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्याकडे त्या आशयाची फाईल ठेवल्याचे समजते. याबाबत शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांच्या भ्रमणध्वनीवर सांयकाळी ६.४३, ६.४३, ६.४४, ६.४५, ६.४८ वाजता संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.