शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अपघात होताच रातोरात झाले रस्ता बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST

विशाल रणदिवे अडयाळ : दुचाकीस्वाराचा अपघात होताच २४ तासांच्या आत रस्ता दुरुस्त झाल्याचा अविश्वसनीय प्रकार येथील ग्रामीण रुग्णालयासमोर घडला. ...

विशाल रणदिवे

अडयाळ : दुचाकीस्वाराचा अपघात होताच २४ तासांच्या आत रस्ता दुरुस्त झाल्याचा अविश्वसनीय प्रकार येथील ग्रामीण रुग्णालयासमोर घडला. या घटनेत रामचंद्र भारत मखरे (वय २८, रा. नेरला) हे जखमी झाले.

मखरे हे अडयाळ येथील पेट्रोल पंपमधून दुचाकीवरून ग्रामीण रुग्णालयाकडे जात असताना रस्ता अपूर्ण असल्याने त्यांचा अपघात झाला. या ठिकाणी कुठेही सूचना फलक नसल्याने त्यांचा अपघात झाला हे स्पष्ट असले, तरी याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. त्या ठिकाणी उभे असणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून प्रथमोपचार करून रात्री दहाच्या सुमारास नेरला स्वगावी नेण्यात आले.

अपघात झाल्याची माहिती होताच जे बांधकाम दोन दिवस झाले नाही, ते मध्यरात्रीच्या दरम्यान कसे झाले हेही लक्षात घेण्यासारखे आहे. कदाचित होऊ शकते की, पुन्हा त्याच ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून काम तडकाफडकी करण्यात आले असावे; पण हीच शक्कल आधीच लावली असती तर कदाचित हाही अपघात घडला नसता. निलज ते कारधा या महामार्गाचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. यात आतापर्यंत अनेकांचे अपघात झाले, तर काही मृत्युमुखी पडले. अनेकदा आंदोलने झालीत, निवेदन देण्यात आली; पण कंत्राटदार आजही बेजबाबदारपणे काम करून मोकळे होतात आणि सामान्य ग्रामस्थांना व वाहनचालकांना मात्र नाहक त्रास होत आहे.

बॉक्स

सूचना फलक नाही

ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी सूचना फलक असता तर कदाचित अपघात घडला नसता, तसेच अपघात होताच मध्यरात्रीला तेथील बांधकाम करण्याची शक्कल जर आधीच लावली असती, तर तो अपघात होऊन आज त्या कमावत्या माणसाला घरी बसायची वेळही आली नसती. ग्रामीण रुग्णालयात रोज शेकडो लोकांना उपचारासाठी ये-जा करावी लागते हे माहीत असतानासुद्धा तेथील काम तत्काळ न होणे आणि त्याच ठिकाणी त्याचा अपघात होणे याला जबाबदार कोण? असा सवाल आहे.