शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी पाहुण्या पक्ष्यांसाठी जलाशय सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात १३०० च्या वर जलाशय आहेत. हे जलाशय परदेशी पाहुणे पक्ष्यांना दरवर्षी आकर्षित करते. हिवाळ्याला सुरुवात होताच या पक्ष्यांचे आगमन सुरु होते. या पक्ष्यांमुळे जलाशयांचे सौंदर्य फुलून जाते. विदेशातील जलाशय हिवाळ्यात गोठतात. त्यामुळे या प्रदेशातील पक्षी चाऱ्याच्या शोधार्थ भारतात दाखल होतात. भंडारा जिल्ह्यातील विविध तलावांवर या पक्ष्यांची रेलचेल असते.

ठळक मुद्देपक्षी मित्रांसाठी पर्वणी : हॉलंड, फ्रांस, रशियातील पक्ष्यांचे आगमन

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यातील जलाशयांवर विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली असून या पाहुण्यांच्या स्वागतासाठी जलाशय सज्ज झाले आहेत. हॉलंड, फ्रांस, रशिया यासह युरोपीय देशातून आलेल्या पाहुण्या पक्ष्यांनी जलाशय फुलून जातात.भंडारा जिल्ह्यात १३०० च्या वर जलाशय आहेत. हे जलाशय परदेशी पाहुणे पक्ष्यांना दरवर्षी आकर्षित करते. हिवाळ्याला सुरुवात होताच या पक्ष्यांचे आगमन सुरु होते. या पक्ष्यांमुळे जलाशयांचे सौंदर्य फुलून जाते. विदेशातील जलाशय हिवाळ्यात गोठतात. त्यामुळे या प्रदेशातील पक्षी चाऱ्याच्या शोधार्थ भारतात दाखल होतात. भंडारा जिल्ह्यातील विविध तलावांवर या पक्ष्यांची रेलचेल असते. या पक्ष्यांचा अभ्यास करण्याची संधी पक्षी अभ्यासकांना आणि पक्षीमित्रांना उपलब्ध होते.जिल्ह्यात सागर बाड्डा, चिखल्या बाड्डा, शेंदऱ्या बाड्डा, चिमन शेंद्र्या, राजहंस, चक्रवाक, कलहंस, लालशिर गजरा, सोनुला, खैरा बाड्डा आदी पक्ष्यांचे आगमन दरवर्षी होते. सध्या कडाक्याच्या थंडीला प्रारंभ झाला नाही. मात्र तुरळक जलाशयांवर पक्ष्यांचे आगमन होत आहे. यावर्षी १०० टक्के पाऊस झाल्याने जलाशय तुडूंब भरली आहेत. चिला, गादगवत, देवधान, खस, पडार आदी गवती वनस्पतीचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पक्ष्यांना लपण म्हणून त्याचा उपयोग होतो. समशितोष्ण वातावरणात आपल्याडील जलाशय गोठत नाही. गादगवताचे कोंब, देवधान, मासे, शंख, शिंपले, झिंगे, गोगलगाय आदींचा पाहुणे पक्षी खाद्य म्हणून वापर करतात.यावर्षी वाढणार मुक्कामभरपूर पाऊस व विपुल प्रमाणात खाद्य उपलब्ध असल्याने यावर्षी पाहुण्या पक्ष्यांचा मुक्काम मार्चपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मात्र अलीकडे या पक्ष्यांच्या शिकारीच्या घटनात वाढ झाली आहे. त्यामुळे शासकीय स्तरावर उपाययोजना करण्याची मागणी पक्षीनिरीक्षक विनोद भोवते यांनी केली आहे.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य