मेळाव्यात ४६० बेरोजगारांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST2020-03-04T05:00:00+5:302020-03-04T05:00:28+5:30

रोजगार मेळाव्यासाठी तालुक्यातील ४६० सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी केली. यावेळी पुणे, कोल्हापूर तसेच राज्याबाहेरील कंपनींनी सहभाग नोंदविला. आमदार राजू कारेमोरे यांनी जिल्ह्यातील कंपन्यांचा रोजगार देण्यात सहभाग नसून जिल्ह्यातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून जास्तीत जास्त स्थानिक कंपन्यांना सक्ती करण्याचे निर्देश देणार असल्याचे सांगितले

Registration of 460 unemployed at the fair | मेळाव्यात ४६० बेरोजगारांची नोंदणी

मेळाव्यात ४६० बेरोजगारांची नोंदणी

ठळक मुद्देमोहाडी येथे आयोजन : १५ कंपन्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजक मार्गदर्शन केंद्र व सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या वतीने मोहाडी येथे आयोजित रोजगार मेळाव्याला तरूणांची मोठी गर्दी झाली होती. उद्घाटन आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार मधुकर कुकडे, जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्ष सीमा भुरे, जिल्हा महासचिव विजय पारधी, खुशाल कोसरे, बबलू सैय्यद, पुरूषोत्त पात्रे, प्रतिभा राखडे, अनिल काळे, श्याम कांबळे, भाऊराव निंबार्ते, बालू चुन्ने उपस्थित होते.
रोजगार मेळाव्यासाठी तालुक्यातील ४६० सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी केली. यावेळी पुणे, कोल्हापूर तसेच राज्याबाहेरील कंपनींनी सहभाग नोंदविला. आमदार राजू कारेमोरे यांनी जिल्ह्यातील कंपन्यांचा रोजगार देण्यात सहभाग नसून जिल्ह्यातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून जास्तीत जास्त स्थानिक कंपन्यांना सक्ती करण्याचे निर्देश देणार असल्याचे सांगितले. बेरोजगारांना मार्गदर्शन करताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विविध कंपन्यांचा सहभाग वाढविण्याचे यावेळी आश्वासन दिले.
भारतीय युवा सुशिक्षित बेरोजगार संस्था बारव्हाच्या अध्यक्ष बालू चुन्ने यांनी तालुक्यातील बेरोजगारांसाठी जिल्ह्यातच संधी मिळाव्या तसेच शिक्षणाचा फायदा घेवून स्वत: बरोबरच गावाचा विकास करण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर बेरोजगार युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोहाडी येथील रोजगार मेळाव्यात ४६० बेरोजगार युवकांनी नोंदणी केली.
 

Web Title: Registration of 460 unemployed at the fair