शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सामाजिक वनीकरणाच्या कामात बोगस मजुरांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 5:00 AM

गांधीटोला येथील बेरोजगार युवकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून खऱ्या अर्थाने ज्या युवकांना कामाची गरज असते त्यांना दोन तीन आठवड्याचे काम देवून बंद करण्यात आले. इतर काही लोकांना सतत वर्षभर कामावर ठेवण्यात आले. तसेच हजेरी रजिस्टरवर काही अशा लोकांची नावे चढविण्यात आली की जे दुसऱ्या ठिकाणी काम करुन किंवा नोकरी करुन अर्थाजन करीत आहेत.

ठळक मुद्देशासनाला आर्थिक भुर्दंड : बेरोजगार युवकांना काम नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील गांधीटोला परिसरात सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून वृक्ष लागवड आणि वृक्षांची देखभाल करण्याचे काम मागील दीड वर्षापासून सुरु आहे. येथील कामात मोठ्या प्रमाणावर बोगस मजूर भरती करुन त्यांच्या नावाची मजुरीची रक्कम हडपली जात असल्याचा आरोप काम करणारे कर्मचारी आणि कामाची पाहणी करणारे लोक करीत आहे. त्यामुळे गांधीटोला येथील बेरोजगार युवकांमध्ये रोष व्याप्त आहे.गांधीटोला येथील बेरोजगार युवकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून खऱ्या अर्थाने ज्या युवकांना कामाची गरज असते त्यांना दोन तीन आठवड्याचे काम देवून बंद करण्यात आले. इतर काही लोकांना सतत वर्षभर कामावर ठेवण्यात आले. तसेच हजेरी रजिस्टरवर काही अशा लोकांची नावे चढविण्यात आली की जे दुसऱ्या ठिकाणी काम करुन किंवा नोकरी करुन अर्थाजन करीत आहेत. त्यांच्या नावाने खात्यात आपोआप मजुरीची रक्कम जमा होते.यापैकी एका बोगस मजुराने कबूल सुद्धा केले. मी वनीकरणाच्या कामावर जात नाही तरी खात्यावर मजुरीची रक्कम जमा केली. रक्कम जमा झाल्यावर कामाची देखरेख करणाºया कर्मचाºयाने रक्कम काढून मागीतली अशा प्रकारे अनेक लोक बोगस मजूर म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे गरजू बेरोजगार लोकांना कामापासून वंचित राहावे लागते.बोगस मजुरांची भरती करुन लाखोचा भुर्दंड शासनाला बसत आहे.तर बेरोजगार युवकांना मजुरी मिळत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी पं.स.सभापती तुकाराम बोहरे, भुमेश्वर मेंढे, रेखा फुंडे यांनी केली आहे. नियमित कामाची मागणी करणाऱ्या युवकांमध्ये खेमेंद्र कोरे, रामदास कोरे, धमेंद्र गाते, विक्की चर्जे, रोहीत कोरे, निलेश राऊत, नितेश कोरे, महेश कठाणे, रामदास कोरे, संदीप भांडारकर, राहुल कोरे, रितेश गजबे, शुभम वाढई, निखिल शेंडे, रामकृष्ण भाजीपाले, आकाश कोरे, सुशील मेंढे, स्वयंम चुटे, विनीत मेंढे, दीक्षीत कोरे, हाबुराव कोरे या युवकांचा समावेश आहे.

टॅग्स :Socialसामाजिक