शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आढळले दुर्मिळ राजहंस बदक व पांढरे करकोच

By admin | Updated: March 4, 2016 00:37 IST

ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबद्वारे सातत्याने १५ व्या वर्षीसुद्धा भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ४० तलावावरील स्थलांतरीत पाणपक्ष्यांची गणना करण्यात आली.

व्हाईट स्टार्क पक्ष्याची नोंद : ग्रीनफ्रेन्डस्तर्फे पक्षीनिरीक्षण व पक्षीगणनाचंदन मोटघरे  लाखनीग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबद्वारे सातत्याने १५ व्या वर्षीसुद्धा भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ४० तलावावरील स्थलांतरीत पाणपक्ष्यांची गणना करण्यात आली. यावर्षी भंडारा जिल्ह्यात प्रथमच स्थलांतरीत दुर्मिळ राजहंस बदले व व्हाईट स्टार्क पक्षी पांढरे करकोच विविध तलावावर दिसून आले.यावर्षी ३० च्या संख्येने राजहंस बदके भंडारा जिल्ह्यात चार तलावावर आढळली आहेत तसेच स्थलांतरीत पांढरा करकोचा व्हाईट स्टार्क पक्षी प्रथमच भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील तलावावर आढळला आहे. भंडारा जिल्ह्याच्या स्थलांतरीत पक्षी वैभवात दुर्मिळ पक्ष्यांची भर पडली आहे. यासोबत ग्रे लंग गुज, चमचाचोच बदक, पिनटेल, मोठी लालझरी आदी प्रकाराची बदके आढळली आहेत. ग्रीनफ्रेन्डस्चे संघटक प्रा. अशोक गायधने यांच्या नेतृत्वात पक्षीगणना करण्यात आली.दुर्मिळ राजहंस बदकाच्या डोक्यावर दोन काळ्या रेषा असल्याने त्यात पट्टकांदळ किंवा बारहेडेड गुज असे म्हणतात. हे बदक सैबेरिया, मंगोलिया, लडाख, लेट, काश्मिर भागात यांचे वास्तव्य असते. आतापर्यंत हे बदक दरवर्षी चंद्रपूर, नागपूर, वर्धा व उर्वरित विदर्भात यांची उपस्थिती असते. दुर्मिळ व्हाईट स्टार्क पक्ष्याची नोंद फार कमी वेळा विदर्भात झाली असून हा पक्षी भंडारा-गोंदिया व पुर्व विदर्भातील तलावांवर प्रथमच आढळला आहे. रिचर्ड ग्रिमेंट, इनस्कीप यांच्या पक्षी पुस्तकात मध्य भारत, उत्तर भारतात फारच तुरळक नोंदी आहेत. हा पक्षी रंगित करकोचा पेंटेड स्टार्क प्रमाणे प्रथमदर्शनी नजरेस पडतो परंतु चांगले निरखुन पाहिले असता रंगित करकोचा उघड्या चोचीचा बलाक ओपन बील स्टार्ड या पक्षंपेक्षा वेगळा फरक दिसत असल्याचे सांगितले. या पक्ष्याची चोच व पाय हे लालसर असून हा युरोपातून इरानण अफगाणीस्तान, पाकिस्तानमार्गे भारतात तुरळक ठिकाणी भेट देत असतो. याचा पंख व शेपटीचा भाग काळसर असतो.याबरोबरच दुर्मिळ कलहंस बदके, चक्रवाल, नकटा, लहान स्वरल, गढवाले, तरंग, धनवर बदक, थापट्या, अटला बदक, चक्रांग बदक, भुवई, तलवार बदक, मोठी लालसरी, साधी लालसरी, शेंडीबदक, नयनसरी या बदकासोबत शेकाट्या, चिखत्या, पियु, कमलपक्षी, चमचाचोच बदक, चांदी बदक, पाणडुबी, जांभळी पाणकोंबडी, तुतवार, उघड्या चोचीचा करकोचा, ग्रेहेरान, पर्पल हेरान, किंगफिशर व्हाईट व ब्लॅक तसेच ग्लासी आयबिस इत्यादी प्रकारचे पाणपक्षी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील तलावांवर पक्षीनिरीक्षण व पक्षीगणना करण्यात आली.