शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

जिल्ह्याला पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, भंडारा, लाखनी, साकोली तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. आंधळगाव येथे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. हिवरा चेकपोस्टवर पोलिसांसह अन्य आरोग्य कर्मचाऱ्यासाठी उभारण्यात आलेली राहूटी वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली. मोहाडी शहरात मेघगर्जनेसह पाऊस बरसल्याने दोन तासांपेक्षा जास्त वीज पुरवठा खंडीत राहिला.

ठळक मुद्देरबी हंगामाला फटका : खरिपाच्या मशागतीसाठी उत्तम, भाजीपाला पिकांवर संक्रात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मान्सूनपूर्व पाऊस बरसला. विजांचा कडकडाट, सुसाट वारा व त्यानंतर पाऊस बरसला. या पावसाने रबी हंगामांतर्गत अंतीम टप्यात असलेल्या शेतीच्या कामाला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी कापणी झाली असून मळणीही झाली आहे. खरेदीसाठी ठेवलेले धान ओले झाल्याची प्राथमिक माहिती आहे.जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, भंडारा, लाखनी, साकोली तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. आंधळगाव येथे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. हिवरा चेकपोस्टवर पोलिसांसह अन्य आरोग्य कर्मचाऱ्यासाठी उभारण्यात आलेली राहूटी वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली. मोहाडी शहरात मेघगर्जनेसह पाऊस बरसल्याने दोन तासांपेक्षा जास्त वीज पुरवठा खंडीत राहिला.तुमसर शहरासह काही ग्रामीण भागात पाऊस बरसल्याची प्राथमिक माहिती आहे. लाखनी येथे मेघगर्जनेसह पाऊस बरसला. विद्युत प्रवाह खंडीत झाल्याने आबालवृध्दांची गैरसोय झाली होती. पालांदूर परिसरातही वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. वीज पुरवठाही खंडीत झाला.भंडारा तालुक्यातील शहापूर, जवाहरनगर, फुलमोगरा, उमरी, सावरी, परसोडी, ठाणा पेट्रोलपंप, खरबी नाका येथे पाऊस बरसला.उकाड्यापासून भंडारेकरांची सुटकारविवारी सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस बरसल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला. २५ मे पासून नवतपाला प्रारंभ झाल्यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत होती. अंगाची लाहीलाही होत असताना पाऊस केव्हा बरसेल याचा प्रतीक्षेत नागरिक होते. नवतपात पाऊस बरसतो असे जानकारांचे मत आहे. या मताला वरुण राजानेही खरे ठरविले. पावसाने जिल्हावासीयांची उकाड्यापासून थोडा वेळ का असेना सुटका केली.

 

टॅग्स :Rainपाऊस