बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 05:00 AM2022-05-12T05:00:00+5:302022-05-12T05:00:51+5:30

शेतकऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. ही मागणी मंजूर केल्यानंतर बुधवारी सकाळी लाखांदूर पोलीस ठाण्याचे हवालदार दिलीप भोयर आणि महिला शिपाई सरिता मदनकर बंदोबस्तासाठी गेले. महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उकीरडा व हातपंप हटविण्याचे काम सुरू असताना या पाच जणांनी अडथळा आणून पोलिसाला धक्काबुक्की केली. याप्रकरणी लाखांदूर ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरून गुन्हा नोंदविला.

Pushing the police who went for security | बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की

बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतातील उकीरडा आणि हातपंप हटविण्यासाठी तहसीलदारांच्या आदेशावरून बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला पाच जणांनी धक्काबुक्की करण्याची घटना तालुक्यातील किन्ही (गुंजेपार) येथे बुधवारी सकाळी १०.३० वाजता घडली. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध लाखांदूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
होमकांत इसन दानी (६७), भोजराज इसन दानी (५५), चंद्रकिरण होमकांत दानी (३६), वसंत सुरेश दानी (३४), महेश सुरेश दानी (२८, सर्व राहणार किन्ही) अशी पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. किन्ही येथील दुलिचंद इसन दानी या शेतकऱ्याच्या शेतजमिनीवर उकीरडा व हातपंप आहे. हा उकीरडा व हातपंपाच्या मालकीवरून होमकांत दानी यांच्यासोबत वाद सुरू होता. याप्रकरणी लाखांदूर तहसीलदारांनी दुलिचंद दानी यांच्या बाजूने आदेश पारीत केला. तसेच शेतातील उकीरडा व हातपंप हटविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शेतकऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली.
ही मागणी मंजूर केल्यानंतर बुधवारी सकाळी लाखांदूर पोलीस ठाण्याचे हवालदार दिलीप भोयर आणि महिला शिपाई सरिता मदनकर बंदोबस्तासाठी गेले. महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उकीरडा व हातपंप हटविण्याचे काम सुरू असताना या पाच जणांनी अडथळा आणून पोलिसाला धक्काबुक्की केली. याप्रकरणी लाखांदूर ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरून गुन्हा नोंदविला.

पाचही जणांना अटक

-  बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ठाणेदार रमाकांत कोकाटे यांनी शासकीय कामात अडथळा व धक्काबुक्कीप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर या पाचही जणांना किन्ही गुंजेपार येथे जाऊन अटक केली. पोलिसांना केलेल्या या धक्काबुक्कीने लाखांदूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

Web Title: Pushing the police who went for security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस