शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाकप व किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST

आंदोलनाचे नेतृत्व भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे व किसान सभेचे सचिव माधवराव बांते ...

आंदोलनाचे नेतृत्व भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे व किसान सभेचे सचिव माधवराव बांते यांनी केले.

शेतकऱ्यांच्या देशव्यापी चेतावणी दिनानिमित्त भाकप व किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांच्या कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच शनिवारी कार्यालयांना सुटी असल्याने भंडारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप केंद्रे यांना निवेदन देण्यात आले. त्यात देशव्यापी मागण्या - शेतकरी विरोधी तीन काळे कायदा कायदे रद्द करण्यात यावे. वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्या, सर्व पिकांसाठी किमान हमीभावाचा कायदा करा, सर्व बेरोजगारांना लाॅकडाऊनच्या काळासाठी मोफत धान्य व साडेसात हजार रुपये देण्यात यावे. सर्वांसाठी मोफत कोरोना लस उपलब्ध करून देण्यात यावे. खमारी बुट्टी (ता. भंडारा) येथील पूर पीडित गावकऱ्यांच्या घरात पाणी घुसल्याने अनेकांची घरे पडली, त्यांना ९५ हजारांचे आर्थिक सहाय्य, अतिक्रमित घरकूलधारकांची घरे नियमानुकूल करून मालकी पट्टे देण्यात यावे. गणेश चिचामे यांना महसूल विभागाच्या चुकीमुळे वन हक्क कायद्याच्या अंतर्गत पट्ट्यापासून वंचित करण्यात आले. त्यांना मालकी पट्टे देण्यात यावे. नंदकिशोर रामटेके व इतर प्रलंबित जबरान जोतदारांना मालकी पट्टे देण्यात यावे. महादेव आंबाघरे सुरेवाडा पुनर्वसन यांना मंजूर भूखंड देण्यात यावे. तसेच ग्रामसेवक कॉलनी भंडारा येथील उर्वरित २७ प्रकल्पग्रस्तांना मोबदला व भूखंड देऊन पुनर्वसन करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनात हिवराज उके, माधवराव बांते सदानंद इलमे, महानंदा गजभिये, गजानन पाचे, वामनराव चांदेवार, रत्नाकर मारवाडेे, गणेश चिचामे, विलास केजकर, महादेव ताराचंद आंबाघरे, हरिदास जांगडे, गिरधारी मेश्राम, सुनील बोरकर आदींचा समावेश होता.