शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचे रक्षण ही चळवळ व्हावी

By admin | Updated: October 3, 2015 00:37 IST

भारत देशात वनसंपदेची खाण आहे. वन्यप्राणी व पशु पक्षी ही जंगलाची शान असून त्यांनासुद्धा मानवाप्रमाणेच जीवन जगण्याचा अधिकार आहे.

ग्रीन हेरिटेजचा पुढाकार : वन्यजीव सप्ताह भंडारा : भारत देशात वनसंपदेची खाण आहे. वन्यप्राणी व पशु पक्षी ही जंगलाची शान असून त्यांनासुद्धा मानवाप्रमाणेच जीवन जगण्याचा अधिकार आहे. पशु-पक्ष्यांची अनेक दुर्लभ जाती समृद्ध वनात आहेत. परंतु काही समाजकंटकांमुळे वन्य प्राणी धोक्यात आले आहे. त्यांचे रक्षण ही काळाची गरज आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील ग्रीन हेरिटेज संस्थेने पुढाकार घेतला आहे.वाढती लोकसंख्या, अवैध शिकार, औद्योगिकरण व प्रदूषणामुळे पशु-पक्ष्यांच्या जाती नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता वन्य जीवांचे रक्षण व संवर्धन करणे, आपणही ‘जगा आणि जगू द्या’ यानुसार प्राणीमात्राबद्दल दयाभाव ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.भारतासारख्या निसर्ग उपासक देशात मुक्या पशु-पक्ष्यांची शिकार अनेक वर्षापासून सुरू आहे. समुद्ध वनांतील गौरव, रंगीबेरंगी पक्ष्यांची शिकार होत असून बाजारात विकायला आणतात. या पशु-पक्ष्यांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. कावळे, चिमण्या, गिधाड यांची संख्या अल्प झाली आहे. हे सर्व आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. मानवविना पक्षी जिवंत राहू शकतील, पण पक्ष्यांविना मानवाला जगणे कठीण जाईल.जंगलात पाण्याविना आणि शिकाऱ्यांमुळे वन्य प्राण्यांचे जीवन संकटात सापडले आहे. वाढती उष्णता व आगीमुळे वनातील प्राणी, वन्यजीव गावांकडे किंवा शहराकडे धाव घेतात. रस्त्यावरील दुर्घटनेत आपले नाहक जीव गमावतात. पाण्यात विष टाकून व विद्यत प्रवाहाने प्राण्यांचा जीव घेतला जातो. याबाबत जनजागृतीची गरज आहे. राष्ट्रांच्या या अनमोल संपत्तीला आज वाचविण्यासाठी अत्यंत गरज आहे. पृथ्वीवर राहायला जागा नसेल म्हणून मुक्या प्राण्यांचे लचके तोडणे, त्यांची शिकार करणे हे थांबले पाहिजे नाही तर भविष्यात निसर्ग आपत्ती व महासंकटांशी सामोरे जावे लागणार आहे. हा सर्व प्रकार उघड्या डोळ्याने न बघता, या सर्वात आपला सक्रिय सहभाग घ्यावा लागेल.निसर्ग संरक्षणाबरोबरच प्राणी व वन्य जिवांचेही संरक्षणाकरिता जोमाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. वन्य प्राण्यांचे रक्षण केले तरच आपले व पुढील पिढींचे भवितव्य सुरक्षित राहील. दि.१ ते ७ आॅक्टोबर विश्व वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जनजागृतीत सर्वांनी सहभाग घेणे महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)