शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

शहर विकासाला प्रशासकीय मान्यतेची अडचण

By admin | Updated: April 22, 2017 00:37 IST

तब्बल दोन वर्षाच्या प्रशासकीय काळात प्रशासकांनी साकोली येथे २ कोटी ५१ लक्ष ६० हजार २७१ रुपयांची

 २ कोटी ५१ लाखांची कामे प्रस्तावित : अंदाजपत्रकावर १३.३७ लाख खर्च साकोली : तब्बल दोन वर्षाच्या प्रशासकीय काळात प्रशासकांनी साकोली येथे २ कोटी ५१ लक्ष ६० हजार २७१ रुपयांची कामे प्रस्तावित केली. या कामासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले ; मात्र यातील २९ कामांना प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने ही कामे रखडलेली आहेत. परिणामी साकोलीच्या विकासात अडचण निर्माण होत आहे. सद्या अस्तित्वात असलेली विद्यमान प्रशासन प्रशासकांच्या काळातील कामांना मंजूरी देणार की नाही हाही महत्वाचा मुद्दा बनला आहे. साकोली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतमध्ये झाले. परंतू या नगरपंचायतीवर स्थगिती असल्यामुळे तब्बल दोन वर्ष प्रशासक नेमण्यात आले. प्रशासकांच्या काळात तब्बल २ कोटी ५१ लक्ष ६० हजार २७१ रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यात एकुण ३३ कामांचा समावेश करण्यात आला. अंदाजपत्रक तयार करण्यासाठी १३ लक्ष ३७ हजार ९१५ रुपये देय करण्यात आले. यापैकी पाच कामांच्या निविदा काढण्यात आल्या व कामे संबंधित यंत्रणेला देण्यात आली. यातील उर्वरीत २९ कामांची प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने ती कामे तशीच रखडली आहेत. प्रशासकांनी त्याच काळातील कामाची यादी व तयार केलेले अंदाजपत्रक हे कोट्यवधी रुपयांचे असून सदर कामाचे अंदाजपत्रक हे जिल्हाधिकारी कार्यालयात रखडून आहेत. प्रशासकांनी कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात व अंदाजपत्रक तयार करणाऱ्या एजंसीला पैसे देण्याची ऐवढी घाई का केली हा न समजणारा प्रश्न आहे. ज्या प्रमाणात प्रशासकाच्या काळातील अंदाजपत्रके तयार करण्यात आली लाखोचा खर्च करण्यात आला मग त्यांना प्रशासकीय मान्यता का मिळाली नाही,हा प्रश्न आहे.(तालुका प्रतिनिधी)