शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तालुकानिहाय आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 05:00 IST

उन्हाळ्याच्या कालावधीत ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होते. त्याअनुषंगाने पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव तयार करा व बंद असलेल्या योजना सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले. बंधारे बांधून पाणी पातळी वाढवता येईल. त्याअनुषंगाने सर्व विभागांनी कार्यवाही करावी व कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देशआमदार नाना पटोले यांनी दिले.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडणे गरजेचे आहे. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी तालुकानिहाय कृती विकास आराखडा तयार करा, असे निर्देश काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, जिल्हा जलसंधारण अधिकारी  अनंत जगताप उपस्थित होते. घरकुल हा गोरगरीब नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. घरकुल योजनेचा लाभापासून गरीब व गरजू लाभार्थी वंचित राहू नये, यासंबंधी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. घरकुलाचे बांधकाम करताना जागेचा प्रश्न निर्माण होतो. त्याअनुषंगाने झुडपी जंगल व गावठाणाची जागा मिळण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.उन्हाळ्याच्या कालावधीत ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होते. त्याअनुषंगाने पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव तयार करा व बंद असलेल्या योजना सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले. बंधारे बांधून पाणी पातळी वाढवता येईल. त्याअनुषंगाने सर्व विभागांनी कार्यवाही करावी व कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.

कीडींचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी उपाययाेजना कराखरीप हंगामात सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव झाल्याच्या अनेक तक्रारी येत असून, त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. धान पिकावर खोडकीडा व इतर रोगांच्या अनुषंगाने औषधसाठा उपलब्धतेचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. रासायनिक खतांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. रासायनिक खतांचा काळाबाजार करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आल्याचे कृषी विभागातर्फे बैठकीत सांगितले. तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव आता नसला, तरी पुढील काळात आल्यास त्यावर उपाय योजना करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले