रनिंग दारुभट्टीवर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 05:00 AM2020-11-20T05:00:00+5:302020-11-20T05:00:30+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात सिहोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरक्षक नारायण तुरकुंडे यांच्या सहकार्यात पथक तयार करुन कारवाई करण्यात आली. यात बुधवारी सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत मोहफुलापासून दारु निर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ग्राम थेरकर टोळी येथील शेतशिवारात धाड घातली असता प्लास्टीकच्या २५ पाॅलिथीन पिशव्यांमध्ये ७५० किलो मोहफुल आढळून आला.

Police raid on running distillery | रनिंग दारुभट्टीवर पोलिसांची धाड

रनिंग दारुभट्टीवर पोलिसांची धाड

googlenewsNext
ठळक मुद्देसिहोरा पोलिसांची कारवाई : ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त

  लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील अवैध व्यवसाय नष्ट करण्याच्या उद्दिष्टाने राबविलेल्या धडक मोहीम अंतर्गत सिहोरा पोलिसांनी रनिंग दारु भट्टीवर धाड घातली. यात प्लास्टीकच्या पिशव्यांसह ५२ हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी जितेंद्र माणिक थेरकर याच्याविरुद्ध दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात सिहोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरक्षक नारायण तुरकुंडे यांच्या सहकार्यात पथक तयार करुन कारवाई करण्यात आली. यात बुधवारी सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत मोहफुलापासून दारु निर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ग्राम थेरकर टोळी येथील शेतशिवारात धाड घातली असता प्लास्टीकच्या २५ पाॅलिथीन पिशव्यांमध्ये ७५० किलो मोहफुल आढळून आला. पथकाने सदर मोहफुल जप्त करुन ते नष्ट केले. जितेंद्र थेरकर याच्याविरुदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरक्षक नारायण तुरकुंडे, पोलीस उपनिरीक्षक शहारे, पोलीस नायक पडोळे, खोब्रागडे, इळपाते, धमगाये, हेडगे यांनी सहभाग नोंदविला.

विना परवाना वाहतुक करणारे वाहन जप्त
कारधा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या पलाडी गावाजवळ विना परवाना वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीवरुन सदर वाहनात ४० किलो मोहफुल व अन्य साहित्य निदर्शनास आले. वाहनाचा परवानाही नसल्याचे आढळले. याप्रकरणी पोलिसांनी चालक दिनेश हिरामण भोंडे व आशिद लालादास बडोले रा.सिंदीपार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई कारधा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे, सहाय्यक फौजदार सुदाम कांबळे, विवेक रणदिवे, अमोल वाघ, दीपक वैरागडे, दत्तू झंझाड, मेश्राम यांनी केली. 

Web Title: Police raid on running distillery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.