लॉकडाऊनमध्ये पाळीव जनावरांची चिकित्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:00 AM2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:00:57+5:30

भंडारा जिल्हा हा दुग्ध उत्पादनासाठी विदर्भात प्रथम क्रमांकावर आहे. शेळी व कुक्कुट पालनाचा स्वतंत्र व्यवसाय स्विकारून येथील शेतकऱ्यांनी उपजिविकेचे साधन निर्माण केले आहे. त्यामुळे आपल्या जनावरांच्या आरोग्याची काळजी पशुपालक आपल्या घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे घेतात, हे विशेष. अशातच कोरोनाने देशावर संकट ओढविल्याने सर्वत्र लॉकडाऊन आहे.

Pet treatment in lockdown | लॉकडाऊनमध्ये पाळीव जनावरांची चिकित्सा

लॉकडाऊनमध्ये पाळीव जनावरांची चिकित्सा

Next
ठळक मुद्देपशुपालकांच्या मदतीला पशुवैद्यक : जनावरांचे लसीकरण, शस्त्रक्रीया, गर्भधारण व वंधत्व तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामासाठी बाहेर जाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. नागरिकांना घरीच राहा, सुरक्षित राहा असा सल्ला देत आरोग्य विभाग त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत आहे. अशाच संकटसमयी पशुवैद्यकीय विभागाने फिजीकल डिस्टेन्सींगचे पालन करून जिल्ह्यातील पाळीव जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली आहे. तसेच पशु उपचारासोबतच वन्यजीवांचे औषधोपचार करणे व इतर बाबतीत वन्य विभागास सुद्धा मदत करीत आहेत.
भंडारा जिल्हा हा दुग्ध उत्पादनासाठी विदर्भात प्रथम क्रमांकावर आहे. शेळी व कुक्कुट पालनाचा स्वतंत्र व्यवसाय स्विकारून येथील शेतकऱ्यांनी उपजिविकेचे साधन निर्माण केले आहे. त्यामुळे आपल्या जनावरांच्या आरोग्याची काळजी पशुपालक आपल्या घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे घेतात, हे विशेष. अशातच कोरोनाने देशावर संकट ओढविल्याने सर्वत्र लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामासाठी नागरिकांना बाहेर पडण्यावर निर्बंध घातल्यात आहे. या संकटसमयी काळात पाळीव जनावरांकरिता औषधोपचाराची चिंता शेतक-यांना भेडसावत असताना जिल्ह्याचा पशुवैद्यकीय विभाग पशुपालकांच्या मदतीला देवदूत म्हणून धावून आलेला आहे. पशुपालकांच्या जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत आहेत. भंडारा जिल्ह्यात ८५ पशुवैद्यकीय संस्था कार्यरत आहेत. या सर्व संस्थेतील पशुवैद्यक पशुपालकांना आपल्या दवाखाण्यामार्फत पशुंची चिकित्सा करून सेवा देत आहेत. लॉकडाऊनच्या काळात गत वर्षीपेक्षा यावेळी पशुवैद्यकी विभागाच्या तांत्रिक कार्यात वाढ झालेली आहे. जिल्हाभरात पशुचिकित्सेमध्ये लसीकरण, औषधौपचार, शस्त्रक्रिया, गर्भधारणा वंधत्व तपासणी करण्यात येत आहे. तसेच पशु उपचारासोबतच वन्यजीवांचे औषधोपचार करणे व इतर बाबतीत वन्य विभागास सुद्धा मदत करीत आहेत.

अत्यावश्यक सेवेतून पशुपालकांची सेवा
सध्या देशावर कोरोनाचे संकट आहे. या संकटाचा सामना प्रत्येकाला करावा लागतो आहे. गाव असो की शहर प्रत्येकाला या संकटसमयी काळात सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकरी या देशाचा कणा आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकरी, पशुपालकांमुळे दुग्धजण्य पदार्थाची अत्यावश्यक सेवा नागरिकांना पुरविल्या जात आहे. अशावेळी पशुपालकांना पशुवैद्यकीय विभागाकडून पशुचिकित्सेची सेवा पुरविणे आमचे कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रीया जिल्हा पशसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके यांनी दिली. संकटसमयी प्रत्येक वेळी, शेतकरी, पशुपालक हा नागरिकांच्या पाठीशी उभा असतो. पशुपालकांच्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य जिल्हाभर करीत आहोत. पशु उपचारासोबतच वन्यजिवांचे औषधोपचार करणे व इतर बाबतीत वन्य विभागास मदत करीत आहेत. पशुसवंर्धन विभागातील माझे अधिकारी, कर्मचारी पशुपालक व वनविभागास अत्यावश्यक सेवा देत आहेत.

Web Title: Pet treatment in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.