शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:00 AM2020-07-02T05:00:00+5:302020-07-02T05:00:54+5:30

जिल्ह्यात शहरासह अगदी ग्रामीण भागातदेखील खाजगी अनुदानित प्राथमिक, शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या शाळेतील कार्यरत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या सर्व कर्मचाºयांचे वेतन अदा करण्याची जबाबदारी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांची आहे. सध्यास्थितीत अशा सर्व खाजगी शिक्षकांचे नियमित वेतन जिल्हा सहकारी बँकेमार्फत दिले जाते.

Pay teachers' salaries through nationalized banks | शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून द्या

शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून द्या

Next
ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : जिल्हा कर्मचारी समन्वय समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील कार्यरत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे नियमित वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून अदा करण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा शालेय शिक्षण समन्वय समितीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक ) यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्ह्यात शहरासह अगदी ग्रामीण भागातदेखील खाजगी अनुदानित प्राथमिक, शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या शाळेतील कार्यरत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या सर्व कर्मचाºयांचे वेतन अदा करण्याची जबाबदारी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांची आहे. सध्यास्थितीत अशा सर्व खाजगी शिक्षकांचे नियमित वेतन जिल्हा सहकारी बँकेमार्फत दिले जाते. मात्र शासकीय निधी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ठेवण्याबाबतचे वित्त विभागाचे १३ मार्चचे आदेश आहे. १३ एप्रिलचे ग्रामविकास विभागाचे शासन निर्णयानुसार सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच महामंडळे इत्यादीनी त्यांचेकडील यापूर्वीचे खाजगी अथवा सहकारी क्षेत्रातील बँकेतील खाते बंद करुन सर्व बँकिंग व्यवहार केवळ राष्ट्रीयकृत बँकेतूनच पार पाडावे, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील सर्व खाजगी अनुदानित शाळेतील कर्मचारी यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करण्यात यावे, अशी मागणी आहे. याविषयावर शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावर राष्ट्रीयकृत बँकेत शिक्षकांचे खाते काढणेबाबत आदेश देण्याचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रकाश करणकोटे व माध्यमिकचे दिलीप वाघाये यांनी संघटनेला आश्वसन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. उल्हास फडके, राजेश धुर्वे, अंगेश बेहलपांडे, विलास खोब्रागडे, राजेंद्र दोनाडकर, जीवनदास सार्वे, मार्गदर्शक सुधाकर देशमुख, दारासिंग चव्हाण, प्रविण गजभिये, गंगाधर भदाडे, विकास बडवाईक, उमेश मेश्राम आदी उपस्थित होते.
 

Web Title: Pay teachers' salaries through nationalized banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.