शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीत नियमबाह्य मासिक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST

मासिक सभेला नियमानुसारच काम करण्याचा पावित्रा घेतल्यामुळे खंडविकास अधिकाऱ्याने नवीन शक्कल लढवून मासिक सभेच्या हजेरी बुकवर सहीच घेतली नाही. उलट सभापतीवर काही पंचायत समिती सदस्याला हाताशी घेऊन आक्षेप नोंदवून मला सभेतून वाकआऊट करण्यास भाग पाडले. तसेच बीडीओंनी नियमबाह्य मासिक सभा घेतल्याचा आरोप सभापती रोषणा नारनवरे यांनी पत्रकार परिषदेत केला. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देपत्र परिषदेत आरोप: सभापती असतानाही हजेरी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : पंचायत समिती तुमसरला मिळालेल्या शेष फंडाच्या निधीचे चुकीचे नियोजन करण्यात आले. परिणामी विकास कामांना खीळ पाडण्याचे काम खंडविकास अधिकाऱ्यांमार्फत होत आहे. मागील सभेच्या प्रोसेडिंग बुकवर सही केली नाही व मासिक सभेला नियमानुसारच काम करण्याचा पावित्रा घेतल्यामुळे खंडविकास अधिकाऱ्याने नवीन शक्कल लढवून मासिक सभेच्या हजेरी बुकवर सहीच घेतली नाही. उलट सभापतीवर काही पंचायत समिती सदस्याला हाताशी घेऊन आक्षेप नोंदवून मला सभेतून वाकआऊट करण्यास भाग पाडले. तसेच बीडीओंनी नियमबाह्य मासिक सभा घेतल्याचा आरोप सभापती रोषणा नारनवरे यांनी पत्रकार परिषदेत केला. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पंचायत समिती मिळालेल्या शेष फंड निधी अंतर्गत मिळालेल्या रक्कमेचा ५५ टक्के निधी हा दिव्यांग (अपंग) समाज कल्याण व पाणी पुरवठयावर खर्च करणे गरजेचे आहे. असे असताना खंडविकास अधिकारी व लेखाधिकारी यांनी संगनमताने त्या निधी इतरत्र खर्च करून घेतले होते. त्याबाबतची लेखी तक्रार ही मुख्य कार्यपालन अधिकारी व मुख्य वित्त लेखाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार चार लोकांचे शिष्टमंडळाने चौकशी करून घेतली त्यात चौकशी अंती शेष फंडाचे नियोजन चुकीचे ठरविण्यात आले होते. या वित्तीय वर्षात तसेच चुकीचे नियोजन करण्यात आल्याने व मागील काळात झालेल्या कामाचे बिल त्या फंडातून देण्यात यावे, यासाठी नियोजन करण्यात आले होते. सदर कामांना निधी उपलब्ध नसतांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्याचे बिल शेष फंडातुन देऊ नये, असा पवित्रा घेतल्याने खंडविकास अधिकाºयाने हेतू पुरस्सर मला मासिक सभा हजेरी बुकवर सही करू दिली नाही व काही पंचायत समिती सदस्याला हाताशी घेऊन माझ्यावर दबाव आणला व मला वाक आऊट करण्यास भाग पाडले. उपसभापतीच्या अध्यक्षतेखाली सभा उरकवून अपंग तसेच महिलांच्या हक्काच्या निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप सभापतीनी केला आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून तालुक्यातील अपंग, महिला व गरजवंतांकडे न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी ग्रामविकास मंत्री व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी केले असल्याचे सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक