दीक्षा अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:00 AM2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:00:30+5:30

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सुटीच्या कालावधीत ऑनलाईन अभ्यासक्रमाची आवड निर्माण व्हावी यासाठी संचालक राज्य शैक्षणिक संस्था व प्रशिक्षण परिषदेतर्फे दीक्षा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी शाळांना सांगण्यात आले आहे.

Online study for students through Diksha app | दीक्षा अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यास

दीक्षा अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यास

Next
ठळक मुद्देकृष्णमुरारी कटकवार विद्यालयाचा पुढाकार : इयत्तेनुसार शिक्षकांतर्फे सराव मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : संपूर्ण जगभर थैमान घातलेल्या कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे शाळा महाविद्यालय बंद करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सुटीच्या कालावधीत ऑनलाईन अभ्यासक्रमाची आवड निर्माण व्हावी यासाठी संचालक राज्य शैक्षणिक संस्था व प्रशिक्षण परिषदेतर्फे दीक्षा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी शाळांना सांगण्यात आले आहे.
साकोली येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालयातील मुख्याध्यापक विजय देवगिरकर यांनी लॉकडाऊनच्या कालखंडात शालेय ग्रुपची निर्मिती केली. या माध्यमातून शिक्षकांशी संवाद साधत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे व्हॉटस्अ‍ॅप ग्रूप तयार करण्यात आले. प्रत्येक वर्गशिक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक वर्गाचे ग्रूप तयार करुन दीक्षा अ‍ॅपची सुरुवात करून विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम सुरु करण्यात आले. या उपक्रमातून पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृतीयुक्त शिक्षण तसेच कृती करून आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी क्रीडा संघटक शाहीद कुरैशी यांनी ऑनलाईन उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती करून फक्त सकाळी व संध्याकाळी दीड तास पाल्यांना मोबाईल देण्याची विनंती केली. पालकांचेही सहकार्य मिळत असून प्रत्येक वर्गशिक्षकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्यात येत आहेत.

Web Title: Online study for students through Diksha app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.