आता गावोगावी होणार निंबोळी अर्काची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:00:23+5:30

ग्रामीण भागात गावोगावी कडुनिंबाची भरपूर झाडे आहेत. या झाडांना भरपूर निंबोळी असून त्या सध्या पक्व होत आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क तयार करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे केले जात आहे. २५ किलो निंबोळ्या जमा केल्यास त्याच्या पाच टक्के निंबोळी अर्क तयार करता येवू शकतो. निंबोळी अर्क बनवण्याची प्रक्रिया साधी-सोपी असून सोयाबीन, कापूस सारख्या पिकांवर फवारणी केल्यास कीडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. निंबोळी अर्काची फवारणी केल्यास कीडींचा खाण्याचा वेग मंदावतो. तसेच कीडींची अंडी घालण्याची गती कमी होते.

Now Nimboli Arka will be produced in every village | आता गावोगावी होणार निंबोळी अर्काची निर्मिती

आता गावोगावी होणार निंबोळी अर्काची निर्मिती

Next
ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : भंडारा तालुक्यातील १७४ गावात निंबोळी गोळा करण्याची मोहीम, शेतकऱ्यांना आवाहन

संतोष जाधवर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महागड्या कीटकनाशकांचा वापर टाळून त्याला पर्याय म्हणून कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना निंबोळी अर्क तयार करण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील विविध तालुक्यांतर्गत शेतकऱ्यांना निंबोळी जमा करण्याची मोहीम कृषी विभागाने हाती घेतली आहे.
पीकांच्या फवारणीसाठी निंबोळी अर्क तयार केला जाणार असून यामध्ये शेतकºयांचा सहभाग नोंदविला जाणार आहे. ग्रामीण भागात शेतकरी बचत गट, प्रगतशील शेतकरी तसेच कृषी यंत्रणेमार्फत जिल्ह्यात हजारो लिटर निंबोळी अर्क तयार केला जाणार आह. शेतकºयांनी निंबोळ्या गोळा करायला निंबोळी सप्ताहापासून सुरुवात केली आहे.
धानपीक हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी महागडी कीटकनाशके फवारणीसाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते.
ग्रामीण भागात गावोगावी कडुनिंबाची भरपूर झाडे आहेत. या झाडांना भरपूर निंबोळी असून त्या सध्या पक्व होत आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क तयार करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे केले जात आहे. २५ किलो निंबोळ्या जमा केल्यास त्याच्या पाच टक्के निंबोळी अर्क तयार करता येवू शकतो. निंबोळी अर्क बनवण्याची प्रक्रिया साधी-सोपी असून सोयाबीन, कापूस सारख्या पिकांवर फवारणी केल्यास कीडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. निंबोळी अर्काची फवारणी केल्यास कीडींचा खाण्याचा वेग मंदावतो. तसेच कीडींची अंडी घालण्याची गती कमी होते.
भंडारा तालुक्यातील खरबी नाका येथील नवचैतन्य धान उत्पादक गट व सेंद्रिय शेतकरी भात उत्पादक गटामार्फत खरबी नाका येथे निंबोळी अर्क तयार करण्याच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी सहाय्यक रेणुका दराडे कृषीमित्र वंदना वैद्य, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोत्ती अभियाण प्रेरिका संगिता गिरीपुंजे यांच्यासह शेतकरी गटाच्या अध्यक्ष, सदस्य, महिला शेतकरी उपस्थित होत्या. शेतीशाळेतून शेतकºयांसह महिला शेतकºयांची कार्यशाळा घेऊन निंबोळी अर्काचे प्रशिक्षण दिले जात आहे. शेतकºयांनी निंबोळी अर्क तयार करण्यासाठी आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन कृषी विभागाने शेतकºयांना केले आहे.

रासायनिक फवारणीचा खर्च पन्नास टक्यांपेक्षा कमी होतो. शेतकºयांना परिसरात सहजपणे कडुनिंबाचे झाड सहजपणे उपलब्ध होते . कडुनिंब प्रभावी, औषधी गुणधर्धाचे झाड आहे. निंबोळी अर्क रसशोषक कीड विरोधी उत्तम जैविक कीडनाशक म्हणून काम करते. त्यामुळे शेतकºयांच्या रासायनिक फवारणीच्या खर्चात ५० टक्यांची बचत होते. त्यासाठी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात निंबोळ्या गोळा करुन निंबोळी अर्काची निर्मीती करण्याचे आवाहन भंडाºयाचे उपविभागीय कृषी अधिकारी, मिलिंद लाड यांनी केले आहे.

भंडारा तालुक्यात अनेक शेतकरी धान पीकासोबत कापूस, सोयाबीन पिके घेतात. या पिकांची निंबोळी अर्काने फवारणी केल्यास केवळ किडींचे नियंत्रणच होत नाही तर सेंद्रिय शेतीला चालना मिळते. त्यामुळे कमी खर्चात निंबोळी अर्क तयार होत असून शेतकºयांनी विविध कंपन्यांच्या भूलथापांना बळी न पडता, महागडी कीटकनाशके खरेदी टाळून सेंद्रिय शेती मालाला निंबोळी अर्काची फवारणी करावी.
-अविनाश कोटांगले,
तालुका कृषी अधिकारी, भंडारा

Web Title: Now Nimboli Arka will be produced in every village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.