शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नऊ कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना ठप्प

By admin | Updated: September 10, 2014 23:25 IST

शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे आश्वासन देणारी करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सन २०१२ पासून बंद आहे. सदर योजना जि.प. कडे हस्तांतरित झालेली असताना कर्मचाऱ्यांचे वेतन व विद्युत बिल

युवराज गोमासे - करडी (पालोरा)शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे आश्वासन देणारी करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सन २०१२ पासून बंद आहे. सदर योजना जि.प. कडे हस्तांतरित झालेली असताना कर्मचाऱ्यांचे वेतन व विद्युत बिल भरण्यास अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने पाच गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. सन २०१० मध्ये ९ कोटी रुपये खर्चून तयार झालेली योजना आज वांझोटी ठरली आहे. सन २०१० मध्ये करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. वैनगंगा शुगर अँड पॉवर कारखाना देव्हाडा (बु.) च्या बाजूलाच योजनेच्या इमारतीचे, फिल्टर प्लांटचे निर्माण केले गेले. ४ कि.मी. अंतरावरील वैनगंगा नदीवर पंपहाऊस बसवून जलवाहिनी द्वारे देव्हाडा स्थित योजनेत पाण्याचा पुरवठा केला जातो. योजनेमध्ये सुरुवातीला करडी, देव्हाडा गावासह ६ गावांचा समावेश होता. त्यामुळे या योजनेला करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना असे नामकरण केले गेले. करडी गावाने पाण्याचे दर व देखभाल दुरुस्तीवर येणारा खर्च लक्षात घेऊन या योजनेतून स्वत:ला बाहेर काढले. सन २०१२ मध्ये जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेत तत्कालीन जिल्हाधिकारी सचिंद्र सिंह यांच्या सूचनेनुसार योजना सुरु करण्यात आली. निलज खुर्द, निलज बु., नवेगाव, मोहगाव, देव्हाडा आदी ५ गावांसाठी उन्हाळ्यात योजना कार्यान्वित झाली. नियमित पाणी पुरवठा करण्याचे स्वप्न गावकरी व ग्रामप्रशासनाला दाखविले गेले. गावातील नागरिकांनी ५०० रुपयांचे डिमांड भरून नळजोडणी करवून घेतली. ७० रुपये प्रतीमहिना दराने कराची आकारणी करण्याचे आश्वासन त्यावेळी अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले. नागरिकांनी नळाची जोडणी केली. एकट्या निलज बु. गावात १३० नळांचे कनेक्शन घेतले गेले.फेब्रुवारी २०१२ मध्ये योजनेचे ४० हजाराचे वीज बिल थकीत झाल्याने योजना अनेक दिवस बंद होती. लोकमतने या संबंधी अनेकदा वृत्त प्रकाशित करून पाण्याच्या तीव्र समस्येला वाचा फोडल्याने प्रसार माध्यमे व जनतेच्या रेट्यामुळे योजना सुरु झाली. आठवडाभर पाणी नागरिकांना दिले जात नाही. तोच योजनेचे संचालन, देखरेख व किरकोळ दुरुस्तीच्या कामासाठी लावलेल्या कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी आंदोलन पुकारले. १ मार्चपासून योजना बंद पडली ती अजूनही सुरु झालेली नाही. जबाबदारी स्वीकारून योजना कार्यान्वित करण्याची धमक अजूनही अधिकाऱ्यांना दाखविता आली नाही. पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून नागरिक वंचित आहेत.