शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या बचतीसाठी नळांना तोट्या बसविण्याची गरज

By admin | Updated: November 1, 2014 22:47 IST

कमी पर्जन्यमानामुळे भंडारा शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट आहे. कुटूंब चालविताना ज्याप्रमाणे काटकसर केली जाते. तीच काटकसर पाण्याच्या बाबतीत केली तर मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते.

भंडारा : कमी पर्जन्यमानामुळे भंडारा शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट आहे. कुटूंब चालविताना ज्याप्रमाणे काटकसर केली जाते. तीच काटकसर पाण्याच्या बाबतीत केली तर मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. सार्वजनिक नळाला तोट्या बसविल्यास दररोज ७ हजार लिटर्स पाण्याची बचत होऊ शकते. त्यामुळे पाण्याचे मूल्य जाणून बचत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. भंडारा शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. शहराला पाणी पुरवठा जुन्या टाकीतुन होत असुन तिची क्षमता ६० हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्याची आहे. शहरातील ५० टक्के नागरिकांकडे नळजोडणी आहे. शहराच्या लोकसंख्येचा विचार केल्यास दररोज १५ दशलक्ष लिटरची पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, सध्या क्षमतेअभावी सर्व नळ जोडणीधारकांना दोन वेळेला नऊ दशलक्ष लिटर्स पिण्याचे पाणी एका दिवसाला पुरवठा करण्यात येत आहे. शहर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून शहरात घरगुती १२ हजार नळ जोडणी असून ३०० जोडणी सार्वजनिक आहेत.सुमारे ५० वर्षापासून जोडण्यात आलेल्या जलवाहिनीतुन पालिका प्रशासन शहरातील नळ जोडणीधारकांना पाण्याचा पुरवठा करीत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून असलेल्या जलवाहिन्या अनेक ठिकाणाहून जीर्ण झाल्याने मोठ्या प्रमाणात लिकेज होतात. लिकेजमुळे अनेकदा शहरातील पाणी पुरवठा कित्येकदा बंद राहतो. जुन्या फिल्टर प्लँटची क्षमता कमी असल्याने शहरवासीयांना शुध्द पाण्याचा पुरवठा करताना पालिका प्रशासनाची कसरत होत आहे. मुख्य जलवाहिनीवर असलेल्या नळ जोडणीस तोट्या लावणे आवश्यक असते. परंतु, तोट्या नसल्यामुळे पाण्याचा बेसुमार वापर होतो. शिवाय, रस्त्यावर आणि प्रांगणात सडा टाकून पाणी वाया घालविले जाते. यात हजारो लिटर्स पाण्याची नासाडी होते. आवश्यक पाणी घेऊन नळाच्या तोट्या बंद कराव्यात. त्यामुळे मोठ्या दाबाने खालच्या नागरिकांपर्यंत नियमानुसार पाणी मिळेल. परंतु, असे होत नाही. पिण्याचे पाणी भरल्यानंतरही नागरिकांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. पाणी बचतीविषयी विचार केला तर शहरातील सार्वजनिक नळांना तोट्या बसविण्यात आल्यास तब्बल सात हजार लिटर्स पाण्याची दररोज बचत होऊ शकते. पालिकेकडून पाणी सोडल्यानंतर तोट्या नसल्याने आणि गळतीमधून पाणी वाया जात आहे. (शहर प्रतिनिधी)