राष्ट्रीय महामार्ग घाणीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:54+5:30

विविध सभागृह आहेत. येथे आयोजित समारंभातील अरलेले अन्न राष्ट्रीय महामार्गालगत टाकले जाते. या मार्गावरील विक्रेते टाकावू साहित्या रस्त्यालगत फेकून देतात. कोंबड्यांची पिसे आणि अवयव पोत्यात भरून रस्त्याच्या कडेलाच टाकली जाते. याचा परिणाम या परिसरात राहणाऱ्या ठाणा, शहापूर मुजबी, बेला येथील नागरिकांना भोगावा लागते.

National Highway Dirt Distributed | राष्ट्रीय महामार्ग घाणीच्या विळख्यात

राष्ट्रीय महामार्ग घाणीच्या विळख्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : ठाणा ते भंडारा दरम्यान राष्ट्रीय महामार्गालगत टाकाऊ पदार्थ व वस्तू फेकल्या जात असून त्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक आणि वाहनधारक त्रस्त झाले आहेत. तसेच आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
ठाणा ते भंडारा दरम्यान राष्ट्रीय महामार्गालगत नागरी वस्त्या आणि हॉटेलच्या संख्येत वाढ झाली आहे. विविध सभागृह आहेत. येथे आयोजित समारंभातील अरलेले अन्न राष्ट्रीय महामार्गालगत टाकले जाते. या मार्गावरील विक्रेते टाकावू साहित्या रस्त्यालगत फेकून देतात. कोंबड्यांची पिसे आणि अवयव पोत्यात भरून रस्त्याच्या कडेलाच टाकली जाते. याचा परिणाम या परिसरात राहणाऱ्या ठाणा, शहापूर मुजबी, बेला येथील नागरिकांना भोगावा लागते. लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या जास्त प्रमाणात फटका बसतो. सदर रस्त्यालगत सडलेल्या दुर्गंधीयुक्त वाऱ्यामुळे प्रवाशी, नागरिकांच्या आरोग्याला धोका होणार यात शंका नाही. एका गावाहून दुसºया गावात सदर प्राणघात रोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन घनकचरा संकलन एकाच ठिकाणी करण्याची गरज आहे. सध्या या रस्त्यावरून जाताना नाकाला रुमाल लावून जाण्याशिवाय पर्याय नाही.

Web Title: National Highway Dirt Distributed