शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र दिनी ‘माझी कन्या भाग्यश्री’चा गजर!

By admin | Updated: May 1, 2017 00:23 IST

मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या "माझी कन्या भाग्यश्री" या उपक्रमाचा गजर १ मे हा महाराष्ट्र दिनाच्या ....

भंडारा : मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या "माझी कन्या भाग्यश्री" या उपक्रमाचा गजर १ मे हा महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत करण्याचा शासन आदेश महिला व बालकल्याण विभागात धडकला आहे. त्यानुसार, भंडारा जिल्ह्यात नियोजन केले जात असून, ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत१ जानेवारी २०१४ पासून सुरू झालेली सुकन्या योजना विलिन करून "माझी कन्या भाग्यश्री" ही नवीन योजना १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आलेली आहे. सदर योजना दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटूंबात जन्माला येणाऱ्या दोन अपत्य मुलींसाठी लागू असून दारिद्रय रेषेखालील एपीएल कुटूंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी या योजनेतील काही लाभ देण्यात येणार आहेत. "माझी कन्या भाग्यश्री" ही योजना राबविताना क्षेत्रीय कार्यालयांना येणाऱ्या अडचणी विचारात घेउन स्पष्टीकरणात्मक शासन परिपत्रक २२ फेब्रुवारी २०१७ रोजी निर्गमित केले आहे. "माझी कन्या भाग्यश्री" योजनेचा शासन निर्णय व शासन परिपत्रकाबाबत ग्रामस्थांना माहिती व्हावी तसेच ही योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी १ मे रोजी ग्रामसभेत विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. १ मे २०१७ रोजीच्या ग्रामसभेत माझी कन्या योजनेच्या शासन निर्णय व शासन परिपत्रकाचे वाचन करण्याच्या सूचना शासनस्तरावरून आलेल्या असून, या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेले आहेत. (नगर प्रतिनिधी)