साकोलीच्या बाजार परिसरात चिखलच चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:43 IST2021-09-16T04:43:39+5:302021-09-16T04:43:39+5:30

ग्राहकांना जाताच येईना : नगर परिषदेचे दुर्लक्ष साकोली : नगर परिषद साकोली तर्फे नव्याने आखून दिलेल्या बाजारामध्ये चिखल व ...

Mud in the market area of Sakoli | साकोलीच्या बाजार परिसरात चिखलच चिखल

साकोलीच्या बाजार परिसरात चिखलच चिखल

ग्राहकांना जाताच येईना : नगर परिषदेचे दुर्लक्ष

साकोली : नगर परिषद साकोली तर्फे नव्याने आखून दिलेल्या बाजारामध्ये चिखल व पाणी साचल्यामुळे ग्राहकांना जाता येत नाही. दुकानदाराने उभे राहता येत नाही. याकडे नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. साकोलीचा मत्स व मटन बाजार एकोडी रोड येथे होता. पूर्ण काळात तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी हे मार्केट हे पटाच्या मैदानाच्या बाजूला हलविण्यात आले. ही सर्व व्यवस्था नगर परिषद मार्फत करण्यात आली होती. त्यावेळी पावसाळ्यात इथे काय त्रास होईल याची आखणी करण्यात आली नाही. परिणामी पावसाळ्यात दुकानदार व ग्राहकांना तिथे चिखल व पाण्याचा त्रास होतो बाजूलाच तलाव असल्याकारणाने तिथे मोठ्या प्रमाणात पाणी असते याचा त्रास दुकानदारांना त्रास तर होतोच मात्र ग्राहकांना सुद्धा होत आहे. नगरपरिषदेने तत्काळ या जागेवर मुरूम टाकून सदर भाग उंच करून दुकानदारांना बसण्याची योग्य ती व्यवस्था व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Mud in the market area of Sakoli