शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरणींसाठी अनेक दरवाजे बंद; कुटुंबाचा गाडा कसा चालणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:33 IST

भंडारा : हाताला काम नसल्याने श्रीमंत घरातील किंवा नोकरपेशांच्या घरातील धुणी व भांडी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मोलकरीण ...

भंडारा : हाताला काम नसल्याने श्रीमंत घरातील किंवा नोकरपेशांच्या घरातील धुणी व भांडी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मोलकरीण महिला भंडारा शहरात दोन हजारांच्या घरात आहेत. त्या महिलांच्या हातून ज्या घरातील धुणी व भांडी होत होती, आता त्याच घरात त्यांना कामावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. एक महिला ६-७ घरे फिरते म्हणून त्यांना कुणीच कामावर ठेवत नाही. त्यामुळे तळहातावर कमावून खाणाऱ्या महिलांना आता पोट भरणे कठीण झाले आहे.

कोरोनाची धास्ती घेतलेल्या लोकांनी आता काम करणाऱ्या मोलकरीण महिलांना कामावर यायचे नाही, असे फर्मान काढले आहे. त्यामुळे लोकांच्या घरची धुणी व भांडी करून पोट भरणाऱ्या महिलांवर आता उपाशी राहण्याची वेळ आली आहे. ८० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी आपापल्या घरातील मोलकरीण महिलांना बंद केले आहे. कोरोनामुळे आम्हीच घरात जास्त वेळ घालवत असल्यामुळे शरीराला व्यायाम म्हणून आम्हीच घरातील कामे करू, असे ठरवून मोलकरणींचे काम करणे घरच्यांनीच सुरू केले आहे. त्यामुळे मोलकरीण महिलांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी हीच परिस्थिती कोरोनामुळे आली होती. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

एका घरातून मिळतात ७०० रुपये

एक महिला दररोज ६-७ घरी मोलकरीण म्हणून काम करते. एका घरातून महिन्याकाठी ७०० रुपये मिळतात. महिन्याकाठी पाच हजारांच्या घरात येणाऱ्या मिळकतीतून आपला संसार रेटण्याचा खटाटोप सुरू असताना कोरोनाचा संसर्ग वाढल्याने हातातून काम गेले. आता घरातच राहात असल्याने पोट कसे भरणार, असा पेच त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

पाच तोंडांचे पोट भरणार कसे?

कोरोनामुळे आमच्या हाताला काम नाही. ज्यांच्या घरून आमची रोजी-रोटी चालत होती, ती रोजी-रोटी कोरोनाने हिसकावली. एकाच घरात पाच सदस्य असून, सर्वांचे पोट भरणे खूप मोठी कसरत आहे. गत दोन वर्षांपासून मोलकरणींची आकडेवारी अस्पष्ट आहे.

- हिवराज उके, पदाधिकारी मोलकरीण संघटना, भंडारा

कोरोनापूर्वी आम्हाला खूप मागणी होती. अनेक घरांत आम्हाला कामासाठी बोलावले जात होते. तेव्हा आम्हालाच वेळ मिळत नव्हता. त्यामुळे अधिक पैसे मोजायला कुणीही तयार होते. परंतु आता आम्हाला कामावर येऊ नका, असे म्हटले जाते. आतापर्यंत ज्यांच्या घरचे काम केले, त्यांनीही आम्हाला आता कामावर येऊ नका, असे सांगितले. त्यामुळे जगावे कसे, हा प्रश्न आहे.

- कमलबाई खेताडे, मोलकरीण महिला, भंडारा

घरात भरपूर लोक आहेत. परंतु हाताला काम नाही. कोरोनाच्या नावावर हातातील रोजगार हिरावला. कुणी कामावर येऊ द्यायला तयार नाही. हाताला कामच नाही तर पोट भरायचे कसे, हा प्रश्न उद्भवला आहे. सरकारने मदत केली नाही.

- माधुरी पुसाम, मोलकरीण महिला, भंडारा

घर चालवायचे कसे याची चिंता

तळहातावर कमावून पोट भरण्याचा धंदा बंद पडल्याने आता दोन वेळचे जेवण करायचे कसे, ही चिंता त्यांना सतावत आहे. कोरोनापेक्षा भुकेची चिंता अधिक सतावत आहे. पहिल्या लाॅकडाऊनमध्ये सामाजिक संघटना, नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक यांनी पुढे येऊन गोरगरिबांना मदत केली. परंतु यंदा कुणीही मदत करायला पुढे आला नाही. आता शासनाने दीड हजार रुपयांची मदत घोषित केली असली तरी या तुटपुंज्या मदतीने उदरनिर्वाह कसा होईल, हा प्रश्न आहे.

कुटुंबासमोर अडचणी

हाताला काम नाही, हातात पैसे नाहीत. ही सर्वांत मोठी अडचण गोरगरिबांपुढे आहे. कोरोनापेक्षा पोटाचे संकट हे त्यांना मोठे वाटत आहे. उपाशी राहून मरण्याची वेळ गोरगरिबांवर आली आहे.