शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आरोग्य केंद्राचा कारभार प्रभारीच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 5:00 AM

तालुक्यातील गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्यातील सर्व प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र असून या ठिकाणी नियमित वैद्यकिय अधिकारी गट. अ असून या ठिकाणी प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर वैद्यकीय अधिकारी हे प्रभारी असल्यामुळे परिसरातील नागरीकांना पाहीजे त्याप्रमाणे आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही.

ठळक मुद्देनियोजनाचा अभाव : आरोग्य सेवा कोलमडली, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जिल्हा परिषद भंडारा आरोग्य विभागा अंतर्गत जिल्ह्यातील सर्व सात ही तालुक्यात एकूण ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. एकूण ६६ वैद्यकीय अधिकारी गट अ ची पदे मंजूर आहेत. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी एमबीबीएसची एकूण ४३ पदे भरलेली असले तरी नियोजनाअभावी तालुक्यात प्रथम सुरू झालेले गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित वैद्यकीय अधिकाऱ्याची जागा वर्षभरापासून रिक्त आहे. आरोग्य केंद्राचा कारभार हे प्रभारीच्या खांद्यावर असल्याने आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे.तालुक्यातील गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्यातील सर्व प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र असून या ठिकाणी नियमित वैद्यकिय अधिकारी गट. अ असून या ठिकाणी प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला आहे.त्यामुळे सदर वैद्यकीय अधिकारी हे प्रभारी असल्यामुळे परिसरातील नागरीकांना पाहीजे त्याप्रमाणे आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही. गोबरवाही हे गाव तालुक्यातील दुर्गम क्षेत्रात आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाही येथे नियमित वैद्यकिय अधिकारी, गट - अ एमबीबीएस यांची नियुक्ती करण्याबाबतचे निवेदन गोबरवाहीचे माजी सरपंच कृष्णकांत बघेल यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी व आरोग्य प्रमुखांना दिले होते. आरोग्य विभागाने बघेल यांना पत्र पाठवून माहिती दिली की, ३३ आरोग्य केंद्राकरिता ६६ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी पद मंजूर आहेत. ४३ पदे भरलेली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात एक स्थायी एमबिबीएस डॉक्टर देता येवू शकते. मात्र नियोजनाअभावी वर्षानुवर्ष स्थायी वैद्यकीय अधिकारीची जागा रिक्त ठेवल्या जात आहे. त्या ठिकाणी बीएएमएसची प्रतिनियुक्तीवर आणि प्रभार सोपवून वेळ मारून नेली जात आहे.सुविधांचा बोजवारावैद्यकीय अधिकारी नसल्याने त्याचा फटका रुग्णांना तर बसतोच. मात्र औषधांचा तुटवडा उपलब्ध नसल्यास आर्थिक भुर्दंडही रुग्णांना बसत असतो. गामीण भागात आजही आरोग्य सुविधांची वानवा आहे. यावर जिल्हा आरोग्य प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.गोबरवाही येथे तालुक्यातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र त्यात नियमित गट अ चे वैद्यकीय अधिकारी गत एक वर्षापासून नाही त्यामुळे प्रभारीच्या खांद्यावर येथील कारभार सुरु आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नाही, या समस्येकडे लक्ष वेधण्याकरिता शासन स्तरावर निवेदन पाठविण्यात आले.-कृष्णकांत बघेल, माजी सरपंच, गोबरवाही.

टॅग्स :Healthआरोग्य