शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चावर सौम्य लाठीमार

By admin | Updated: July 19, 2014 00:44 IST

आदिवासी समाजावर सातत्याने होत असलेल्या

दीड तास महामार्ग ठप्प : दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमीभंडारा : आदिवासी समाजावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आज आदिवासी बांधवांकरवी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा त्रिमुर्ती चौकात आल्यावर महामार्ग रोखून धरण्यात आला. दरम्यान, मोर्च्याला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यावेळी जमावातील एकाने दगड भिरकावल्याने व सुरक्षा कठडे पडल्यामुळे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शास्त्रीनगर चौकातून बी.एस. सय्याम यांच्या नेतृत्वात आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा काढण्यात आला. स्वातंत्र्याला ६५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी आदिवासींच्या समस्या शासनाने गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. आदिवासींच्या मागण्या पुर्ण झाल्या पाहिजेत या बाबीला अनुसरून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा व उपोषण करण्याचे ठरविण्यात आले. त्याअंतर्गत शहरातून भ्रमणकरीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमुर्ती चौकात पोहोचला. पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे चौकातच मोर्चा अडविण्यात आला. मात्र आंदोलकांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: घ्यावे, या मागणीला घेवून परिस्थिती चिघळत गेली. अखेर आदिवासी बांधवांचा संयमाचा बांध फुटला. सुरक्षा कठड्यांना धक्का मारून शेकडो आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. याचवेळी जमावातील एकाने दगड भिरकावल्याने तो दगड पोलीस दलातील शिपाई हत्तीमारे यांच्या डोक्याला लागला. रक्त बंबाळ स्थितीत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. सुरक्षा कठडे कोसळल्यामुळे एक महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावर कोसळली. यात तिलाही दुखापत झाली. सायंकाळी ४.१५ ते ५.२५ पर्यंत महामार्ग रोखून धरल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मोर्चेकरी महामार्गावरून हलत नसल्याचे जाणवल्यानंतर पोलिसांनी अखेर बळाचा वापर केला. सौम्य लाठीमार करत आंदोलकांना महामार्गावरून हिसकावून लावले. १० सेकंदात वाहतूक सुरू करण्यात आली. वारंवार विनंती करूनही आंदोलक रस्त्यावरून हटत नसल्यामुळे ही कारवाई केल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. यादरम्यान मोर्च्यातील शिष्टमंडळ सय्याम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांच्याशी भेट घ्यायला गेले. यात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनही सादर केले. मागण्यांमध्ये २००८ पासून घरकुल बांधकामाचा निधी वाढवून देण्यात यावा, आदिवासींची नोकरी भरती कास्ट व्हॅलीडिटीशिवाय करू नये, वनकायद्याच्या अनुशंगाने आदिवासींच्या जमिनीचे पट्टे व सातबारा त्वरीत देण्यात यावा, लाखांदूर तालुक्यातील चिचगावमधील आदिवासी लोकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, धृ्रपता मसराम या महिलेचा गैरआदिवासींनी घराचे बांधकाम पाडले त्यांच्यावर अ‍ॅट्रासिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, मुळ आदिवासींच्या जमिनीवर आदिवासींनी केलेले अतिक्रमण त्वरीत हटवावे आदी मागण्यांचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)