शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगूल विवाह बंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 02:27 IST

जांभोरा येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सहकार्याने एका प्रेमीयुगुलांचा विवाह पार पडला.

करडी (पालोरा) : जांभोरा येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सहकार्याने एका प्रेमीयुगुलांचा विवाह पार पडला. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या सोहळ्याला ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशांत आसाराम मेश्राम (२६) रा.सावरबंध ता.साकोली तर दुर्गा योगराज भांडारकर (१९) रा.तेलंगखेडी ता.गोरेगाव जिल्हा गोंदिया यांचे एकमेकांवर प्रेम होते. या प्रेम विवाहाला मुलीच्या वडिलांची मंजुरी होती. परंतु मुलाचे आई-वडीलांचा विरोध होता. त्यामुळे मुलगा व मुलगी स्वमर्जीने जांभोरा येथील अरुण बंसोड यांचे घरी राहत होते. त्यांनी आपली प्रेम कहाणी अरुण बंसोड यांच्या कानावर घातली. तसेच लग्न करण्याची इच्छाही जाहीर केली. बंसोड यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला याची माहिती दिली. दोघा प्रेमींनी समितीकडे रितसर अर्ज केला. समितीने सर्व बाजू तपासून लग्न लावून देण्यास सहमती दर्शविली. त्यानुसार ३० मे रोजी गावकरी तसेच तंटामुक्त गाव समिती पदाधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राधेश्याम उईके, सरपंच भूपेंद्र पवनकर, माजी पं.स. सदस्य कवळू मुगमोडे, परमानंद मेश्राम, योगराज मेश्राम, विणा मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता अंगेश दुपारे व गावकरी, पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)