शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातलवाडा येथे विजेच्या धक्क्याने लाईनमनचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST

नितीन माधोराव कांबळे (३२) रा.साकोली असे मृताचे नाव आहे. ते वीज वितरण कंपनीच्या सेंदुरवाफा कार्यालयात कार्यरत होते. शनिवारी त्यांच्या ...

नितीन माधोराव कांबळे (३२) रा.साकोली असे मृताचे नाव आहे. ते वीज वितरण कंपनीच्या सेंदुरवाफा कार्यालयात कार्यरत होते. शनिवारी त्यांच्या क्षेत्रांतर्गत येत असलेल्या सातलवाडा गावात वीज प्रवाहात काही तांत्रिक अडचण आली. आपल्या सहकाऱ्यांसोबत ते दुरुस्तीच्या कामासाठी गेले होते. दुरुस्तीसाठी वीज खांबावर चढले. काम करीत असताना अचानक वीज प्रवाहित तारेला स्पर्श झाला आणि ते खाली कोसळले. सोबतच्या सहकाऱ्यांनी तत्काळ साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तपासणी करताच डाॅक्टरांनी मृत घोषित केले. साकोली पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वीज कशी सुरू झाली?

नितीन कांबळे खांबावर कामासाठी चढले त्यापूर्वी वीज प्रवाह बंद करण्यात आला होता. मात्र काम पूर्ण होण्याआधीच वीजपुरवठा कसा काय सुरू झाला हा प्रश्न आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास खरा प्रकार पुढे येऊ शकतो.