शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

By admin | Updated: October 27, 2014 22:31 IST

पारडी येथील शेतकरी पुरुषोत्तम भेंडारकर यांचे शेतातील विहिरीत बेडूक खाण्याच्या बेतात बिबट्या विहीर पडला. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

लाखांदूर : पारडी येथील शेतकरी पुरुषोत्तम भेंडारकर यांचे शेतातील विहिरीत बेडूक खाण्याच्या बेतात बिबट्या विहीर पडला. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. लाखांदूर तालुक्यात अनेक गावे जंगलाला लागून वसलेली आहेत. दिघोरी सहवन क्षेत्रांतर्गत पारडी हे गाव जंगलाला लागून आहे. गावातील नागरिकांची शेती जंगलालगत असल्याने अनेक हिंस्त्र पशू गावात व शेताकडे धाव घेतात. असाच एक बिबट पारडी गावालगतच्या शेतात शिकारीसाठी आलेला असता पुरुषोत्तम भेंडारकर यांच्या शेतात पाणी प्याला व तोंडी नसलेल्या विहिरीत बेडूक दिसल्याने विहीरीत उडी घेतली. बाहेर येता न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दोन दिवसापूर्वीच घडली असून आज पुरुषोत्तम जेव्हा शेतात गेला त्याला विहिरीजवळ दुर्गंधी आली. विहिरीत डोकावून बघितले असला सडलेल्या अवस्थेत बिबट पाण्यावर तरंगताना दिसला. याची माहिती त्यांनी वनविभागाचे अधिकाऱ्यांना दिली. यापूर्वी दांडेगाव कंपार्टमेंटमध्ये असाच एक बिबट मृतावस्थेत आढळून आला होता. दुसऱ्यांदा बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने या जंगलव्याप्त परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी तडस यांनी सांगितले. सदर मृत बिबट अडीच वर्षाचा असून नर होता. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.लांजेवार यांनी शवविच्छेदन केले. तर सहाय्यक वनसंरक्षक पटले, क्षेत्र सहायक डफरे, जांगळे यांनी मृत बिबट्याला जाळून तपास हाती घेतला. (तालुका प्रतिनिधी)