मांढळ येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST2021-02-05T08:41:26+5:302021-02-05T08:41:26+5:30

तुमसर : तालुक्यातील मांढळ येथे यंदाच्या खरीप हंगामातील जिजामाता बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था पांजरा(दे.)मार्फत खरीप हंगामातील धान ...

Launch of Government Basic Grain Procurement Center at Mandhal | मांढळ येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

मांढळ येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

तुमसर : तालुक्यातील मांढळ येथे यंदाच्या खरीप हंगामातील जिजामाता बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था पांजरा(दे.)मार्फत खरीप हंगामातील धान खरेदी केंद्राचा शुभारंभ जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूला परिसरात आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यंदाच्या हंगामात धान खरेदी केंद्रावर अ ग्रेड धानासाठी १८८८ तर साधारण प्रतीच्या धानाचा दर १८६८ रुपये शासकीय दर आकारण्यात आला आहे.

परिसरातील शेतकऱ्याची धान विक्रीसंबंधी अडचण लक्षात घेता व नव्याने धान खरेदी केंद्राला शासनाकडून मंजुरी प्रदान करण्यात आली. त्या धर्तीवर शेतकऱ्यांनी आपले धान सदर केंद्रावर विक्रीसाठी नेता यावा यासाठी आमदार राजू कारेमोरे यांच्या पुढाकाराने नव्याने धान खरेदी केंद्र मांढळ येथे सुरू करण्यात आले. याप्रसंगी भंडारा जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे अध्यक्ष धनराज चौधरी, काँग्रेस प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, बाजार समितीचे माजी उपसभापती राजकुमार माटे, रामदास बडवाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बालकदास ठवकर, कृषक सेवा सहकारी संस्थेचे संचालक सुरेंद्र वहिले, राजू सेलोकर, संतोष वहिले, संजय पंचबुद्धे, लक्ष्मण हारगुडे, महेंद्र चव्हाण, संजय शेंडे, नरेश सेलोकर, रवींद्र पंचबुद्धे, जिजामाता बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था पांजराचे अध्यक्ष शंकर तितीरमारे, उपाध्यक्ष शरद बारस्कर, सचिव राकेश सिंगाडे, संचालक प्रवीण खवास आदी शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Web Title: Launch of Government Basic Grain Procurement Center at Mandhal