शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या मजुरीपासून मजूर वंचित

By admin | Updated: August 18, 2014 23:18 IST

आलेसूर येथे महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे करणाऱ्या मजुरांना दोन महिन्यांपासून मजूरी मिळाली नाही. याप्रकरणी ग्रामरोजगार सेवकाने केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार

तुमसर : आलेसूर येथे महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे करणाऱ्या मजुरांना दोन महिन्यांपासून मजूरी मिळाली नाही. याप्रकरणी ग्रामरोजगार सेवकाने केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार आलेसूर ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांच्याकडे दिली आहे. मात्र कारवाई थंडबस्त्यात आहे.आलेसूर येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत दिनदयाल नरकंडे ते टीसीएम नालीपर्यंत ८०० मीटर पांदन रस्त्याचे काम ११ मार्च २०१४ ते १६ जूनपर्यंत करण्यात आले. या कामावरून काही मजुरांची मजूरी बँक खात्यात जमा झाली नाही, अशा तक्रारी ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने मस्टर तपासणी करण्यात आली. त्यात ग्राम रोजगार सेवकाने गैरव्यवहार केल्याचे आढळून आले.२१ जूनला विशेष आमसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मस्टरचे वाचन करण्यात आले. त्यात बरीच बोगस नावे आढळून आली. रोजगार सेवकाने सरपंच ग्रामपंचायत कमेटी व ग्रामसेवक यांना विश्वासात न घेता स्वमर्जीने कामे करून स्वत:च्या स्वाक्षरीने मस्टर पंचायत समितीला सादर करण्याच्या चुका ग्रामपंचायत व नागरिकांच्या लक्षात आल्या. त्यामुळे ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाले होते. ३० जून रोजी तीच ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी पुन्हा दोन गटात गोंधळ निर्माण झाला. ग्रामसभेच्या कार्यवृत्तात रोजगार सेवकाला काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेत मात्र निर्णय झाला नाही. (तालुका प्रतिनिधी)