शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मृगधारा बरसल्या, दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST

मंगळवारी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला असून या नक्षत्राचे वाहन गाढव आहे. या नक्षत्रात ...

मंगळवारी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला असून या नक्षत्राचे वाहन गाढव आहे. या नक्षत्रात पावसाची स्थिती कशी राहील यावर पेरणी अवलंबून आहे.

सरासरी हवामान अंदाजानुसार १५ जूनपर्यंत विदर्भात मान्सून दाखल होण्याचा अंदाज असतो. १ जूनला कोकण नंतर ७ जूनपर्यंत मुंबई व हप्ताभरानंतर विदर्भात दाखल होतो. महाराष्ट्रात मान्सून अर्थात नैऋत्य मोसमी वाऱ्याने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे पेरणीकडे कल वाढत असला तरी अर्धे मृग नक्षत्र होईपर्यंत भंडारा जिल्ह्यात पेरणीला गती येत नाही. पाण्याची स्वतंत्र व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणीला आरंभ केलेला आहे. कोरडवाहू शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. धूळ पेरणी धोक्याची होत असल्याने शेतकरी सावधगिरी बाळगत आहे.

बॉक्स

पेरणीची घाई करू नका!

पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. ८० ते १०० मिमी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नये. पेरणीला घाई करण्यापेक्षा रोवणीसाठी कमी दिवसाचे रोप लावावे. मध्यम कालावधीच्या बियाण्याची निवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पद्माकर गीदमारे व मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात पावसाची हजेरी

मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. भंडारा शहरात सायंकाळी पावसाची सर कोसळली. दुपारी ३ वाजताच्या सुमारास वादळी वातावरण तयार झाले होते. वादळाने रस्त्यावर दुकान लावून बसणाऱ्यांचे साहित्य उडून केले. तुमसर तालुक्यातील पवनारा परिसरात मंगळवारी दुपारी २.३० वाजता जोरदार पाऊस झाला. पवनी तालुक्यात आसगावसह चौरास भागात ४५ मिनिटे चांगला पाऊस बरसला. लाखांदूर तालुक्यातही पावसाने हजेरी लावली असून मोहाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. लाखनी तालुक्याच्या पालांदूर परिसरात मृगाच्या हलक्या सरी बरसल्या. या पावसाने नागरिकांची उकाड्यापासून सुटका केली.