शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
4
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
6
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
7
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
8
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
9
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
10
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
11
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
12
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
13
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
14
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
15
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
16
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
17
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
18
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
19
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
20
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आत्महत्येची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST

आफ्रोह संघटनेच्यावतीने उईके यांच्या आत्महत्येप्रकरणी आंदोलन उभे करण्यात आले आहे. २१ डिसेंबर २०१९ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शासन निर्णय प्रसिध्द करुन ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या कर्मचाºयांना ११ महिन्यांचा अधिसंख्य पदावर टाकण्याच्या निर्णय घेतला होता.

ठळक मुद्देआफ्रोह संघटनेची मागणी : यवतमाळ येथील पोलिसाचे आत्महत्या प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जात प्रमाणपत्र अवैध ठरविलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीत संरक्षण देता येणार नाही, या निर्णयाने अडचणीत आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल राजू उईके यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी दबाव आणणाऱ्या संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर उईके यांच्या आत्महत्येप्र्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आॅर्गनाईझेशन फॉर राईट्स आॅफ ह्यूमन (आफ्रोह) संघटनेने केली आहे.
आफ्रोह संघटनेच्यावतीने उईके यांच्या आत्महत्येप्रकरणी आंदोलन उभे करण्यात आले आहे. २१ डिसेंबर २०१९ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शासन निर्णय प्रसिध्द करुन ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांचा अधिसंख्य पदावर टाकण्याच्या निर्णय घेतला होता. यात शासन निर्णयाच्या धसक्यानेच त्यांनी पोलीस ठाण्यातच कर्तव्यावर असताना पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली.
राजू उईके यांच्यासारख्या हजारो कर्मचाऱ्यांनी धसका घेतल्याने अधिसंख्य पदावर टाकण्याच्या भीतीपोटी न्यायालयाचा मार्ग अवलंबिला आहे. यासंदर्भात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही आफ्रोह संघटनेने केली आहे.
तसेच न्यायालयाला खोटी माहिती सादर करणाऱ्यांचाही शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यावतीने राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे आफ्रोह संघटनेच्या वतीने राज्य पातळीवर हा मुद्दा उचलून धरला आहे. एकाच दिवशी १७ जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना निवेदन देत दिवंगत राजू उईके यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून दयावा अशी मागणीही करण्यात आलेली आहे.
निवेदन देताना मंगेश नंदनवार, सुरेश धकाते, नितीन धकाते, जे. टी. कुंभारे, मनोहर हेडावू, महेंद्र बारापात्रे, रामधन धकाते, घनश्याम पराते, नरेंद्र कोहाड, प्रविण खडगी, श्रीकांत खडगी, फत्तु सोनकुसरे, कुंडलिक धकाते, देवचंद नंदनवार, गोवर्धन पिपरे, बाळकृष्ण धकाते, सुरेखा सोनकुसरे, कांचनमाला निमजे, लीला खेताडे, पुनाजी निमजे, दिनेश नंदनवार, व्ही. जे. गौतम, अनिल निनावे, महादेव निनावे, माधवराव धकाते, दुमोद धकाते, एस. एम. हेडाऊ, डी. टी. नंदनवार, आर. डी. नंदनवार, आर. एम. हेडावु, सी.जी. कोहाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliceपोलिसSC STअनुसूचित जाती जमाती