कोरोनातील अल्प खर्चाचे शुभमंगल प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 05:00 AM2020-12-03T05:00:00+5:302020-12-03T05:00:21+5:30

दिवाळीपासून विवाह समारंभ सुरू झालेली आहेत. शहरासह ग्रामीण भागात सुद्धा विवाह सोहळा शाही थाटाऐवजी केवळ मोजक्याच लोकात व आप्तस्वकीयात पार पडत आहेत. संभाव्य कोरोनाचा धोका लक्षात घेता सामाजिक जबाबदारीचे ध्येय बाळगून स्वतः मास्क वापरत  इतरांना सुद्धा मास्क वापरण्याचा मौलिक सल्ला अप्रत्यक्ष दिलेला आहे.

Inspired by the low cost of corona | कोरोनातील अल्प खर्चाचे शुभमंगल प्रेरणादायी

कोरोनातील अल्प खर्चाचे शुभमंगल प्रेरणादायी

Next
ठळक मुद्देजनसामान्यासह वर-वधू सुद्धा कोरोनाशी लढण्यास सज्ज!

  लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : कोरोनामुळे विवाह समारंभावर ही बंधने आली आहेत. थेट आठ महिन्यापासून बंद असलेली सामाजिक  परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेली विवाह परंपरा सुरू झाली आहेत. यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, याकरिता वर्‍हाडी मंडळीसह वर-वधूने सुद्धा मास्क वापरत सर्वांना कोरोनाच्या काळात आरोग्याचा नैसर्गिक मूलमंत्र दिलेला आहे.
दिवाळीपासून विवाह समारंभ सुरू झालेली आहेत. शहरासह ग्रामीण भागात सुद्धा विवाह सोहळा शाही थाटाऐवजी केवळ मोजक्याच लोकात व आप्तस्वकीयात पार पडत आहेत. संभाव्य कोरोनाचा धोका लक्षात घेता सामाजिक जबाबदारीचे ध्येय बाळगून स्वतः मास्क वापरत  इतरांना सुद्धा मास्क वापरण्याचा मौलिक सल्ला अप्रत्यक्ष दिलेला आहे.
जग जसे बदलते तसेच आपण सुद्धा बदलत निसर्गाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करावा. निसर्गानेच कोरोणा सारख्या संसर्गजन्य आजाराला जन्माला घातलेले आहे . प्रदूषण हा सर्वात मोठा शत्रू आरोग्याचा ठरला आहे. त्यामुळे खूप मोठ्या लोकांची गर्दी काढून मोजक्याच आप्तस्वकीय नाते मंडळीत लग्न करण्याची प्रेरणा कोरोनाने समाजाला दिलेली आहे. 
कमी खर्चात व्यवस्थित लग्न उरकण्याची नियमावली कोरोनाने आखुन दिलेली आहे. लोकही समजदार झाले असून समजदारीतूनच कोरोना सारख्या महामारी वर निश्चितच ब्रेक लागलेला आहे. भारतासारख्या १३५ करोड जनतेत सामाजिक अंतर राखत कोरोणाची साखळी तोडणे अशक्य असतानासुद्धा  सामंजस्य राखत विवाह सोहळा पार पडत आहेत.
कोरोना ची दुसरी लाट येण्याची शक्यता  सगळी कडूनच  वर्तवण्यात आलेली होती. तिला रोखणे नितांत गरजेचे होते. रोखण्याकरिता समाजातील प्रत्येक स्तरातून समाज प्रबोधन केले गेले. शासन व प्रशासनाकडून सुद्धा आम जनतेला आवाहन करीत कोरोना ची साखळी सोडण्याकरता सहकार्याचे आवाहन नक्कीच इतरांना प्रेरणादायी ठरली असे वाटते.  प्रत्येकांनी कोरोना नियंत्रणासाठी नियम पाळण्याचे आवाहन होत आहे.
कोरोना नियंत्रणासाठी नियम पाळण्याचे आवाहन
 कोरोना संसर्गजन्य आजारापासून प्रत्येकाला सावध राहणे नितांत गरजेचे आहे. कोरोना ने लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, असा भेद न करता त्याने आपली वचक सर्वांवर ठेवण्याचा प्रयत्न केला.  मात्र ज्यांनी आरोग्याचा नियम पाळला, त्याला निश्चितच कोरोना शिवू  शकला नाही हे विशेष.

Web Title: Inspired by the low cost of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.